JOIN US
मराठी बातम्या / देश / ताकद वाढली! भारतात आणखी 3 rafale दाखल, आता देशाकडे 14 fighter planes

ताकद वाढली! भारतात आणखी 3 rafale दाखल, आता देशाकडे 14 fighter planes

.बुधवारी रात्री उशिरा देशात आणखी तीन राफेल लढाऊ जेट (Rafale Fighter Jet) दाखल झाले आहेत. ही विमानं फ्रान्समधून रात्री सुमारे अकरा वाजेच्या आसपास लॅन्ड झाली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 एप्रिल : भारतीय हवाई दलाच्या ताकदीत आता चार पटीनं वाढ झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा देशात आणखी तीन राफेल लढाऊ जेट (Rafale Fighter Jet) दाखल झाले आहेत. ही विमानं फ्रान्समधून रात्री सुमारे अकरा वाजेच्या आसपास गुजरातच्या जामनगर येथे लॅन्ड झाले. फ्रान्समधून निघालेले हे तिनही राफेल न थांबता थेट भारतात पोहोचले. मार्गात UAE च्या मदतीनं यात हवेतच इंधन भरण्यात आलं. भारतीय हवाई दलानं दिलेल्या माहितीनुसार, यूएई हवाई दलाच्या टँकरच्या माध्यमातून राफेलमध्ये इंधन भरण्यात आलं. हा दोन्ही हवाई दलांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. हवाई दलाकडे १४ राफेल जेट - हे तिनही विमान अंबालामध्ये गोल्डम एरो स्क्वाड्रनमध्ये सामील होतील.या तीन नव्या विमानांच्या आगमनानंतर आता भारतीय हवाई दलाकडे एकूण राफेल विमानांची संख्या 14 झाली आहे. यासोबतच नऊ राफेल लढाऊ जेटची पुढची बॅच एप्रिलमध्ये दाखल होईल. यातील पाच विमानं उत्तर बंगालच्या हाशिमारा एअरबेसवर तैनात करण्याती योजना आहे. भारतानं फ्रान्स सरकारसोबत सप्टेंबर 2016 मध्ये 36 लढाऊ राफेल विमानांसाठी 59,000 कोटींचा व्यवहार केला आहे. भारतीय हवाई दलासाठी लढाऊ राफेल विमान गेम चेंजर मानले जात आहेत. कारण यामुळे आसपासच्या देशांच्या तुलनेत भारत तांत्रिक दृष्ट्या मजबूत झाला आहे. राफेलनं या गोष्टीचा पुरावा लडाखमध्ये आकाशात झेप घेऊन दिलाच होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या