JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / High Alert in Delhi: सणासुदीच्या काळात राजधानीत अतिरेकी हल्ल्याचा धोका; पोलिसांकडून हाय अलर्ट जारी

High Alert in Delhi: सणासुदीच्या काळात राजधानीत अतिरेकी हल्ल्याचा धोका; पोलिसांकडून हाय अलर्ट जारी

High Alert in Delhi: देशाची राजधानी दिल्लीवर ऐन सणासुदीच्या काळात काही अतिरेकी मोठ्या घातपाताच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचरांना मिळाली आहे.

0105

राजधानी दिल्ली सध्या high alert वर आहे. दहशतवादी संघटना देशात हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती भारताच्या सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे.

जाहिरात
0205

दिल्लीचे DCP दीपक यादव यांनी याविषयी बोलताना सांगितलं की आम्हाला सुरक्षा यंत्रणांकडून आतंकवादी हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं आम्ही शहरात ठिकठिकाणी चेकिंग सुरू केली आहे.

जाहिरात
0305

सध्या देशात सणासुदीचा काळ सुरू असून त्या काळातच काही तरी घातपात घडवण्याची तयारी काही अतिरेकी संघटनांची आहे. त्यामुळं आता दिल्ली पोलिसांनी याची खबरदारी घेतली आहे. त्यांनी चेक पॉइंट बनवून गाड्यांची तपासणी सुरू केली आहे.

जाहिरात
0405

दिल्लीतील काही प्रसिद्ध बाजारांमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसवरही पोलीस नजर ठेऊन आहेत. त्याचबरोबर शहरात भाड्याने राहणाऱ्या लोकांचं व्हेरिफिकेशन केलं जात आहे.

जाहिरात
0505

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानस्थित एका अतिरेकी मॉड्यूलचा भांडाफोड केला होता आणि सात आरोपींना अटकही केली होती. हे सर्व जण दिल्लीत सणासुदीच्या काळात अतिरेकी हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी एका अतिरेक्याला AK-47 आणि इतर साहित्यांसह अटक केली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या