JOIN US
मराठी बातम्या / देश / समाजकंटकांकडून सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेची चोरी; नागरिकांचा संताप

समाजकंटकांकडून सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेची चोरी; नागरिकांचा संताप

अद्याप या प्रकरणात कोणी हे कृत्य केलं याबाबत कोणतीही माहिती हाती आलेली नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सतना, 9 फेब्रुवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh, Satna) सतनामधील टाउन हॉल परिसरात राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा पुतळा चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा निषेध केला जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून आरोपींवर कारवाई करीत अटक करण्याची मागणी केली जात आहे. याशिवाय 24 तासाच्या आत कारवाई करीत दुसरी प्रतिमा स्थापित करावी असं आवाहन केलं जात आहे. सोशल मीडियावर या घटनेचा तीव्र विरोध केला जात आहे. अद्याप या प्रकरणात कोणा समाजकंटकांनी हे कृत्य केलं याबाबत कोणतीही माहिती हाती आलेली नाही. सावित्रीबाईंच्या प्रतिमेशेजारी महात्मा ज्योतिबा फुलेंची प्रतिमा आहे. मात्र काही समाजकंटकांनी महात्मा फुलेंच्या शेजारील सावित्रीबाईंची प्रतिमा चोरून नेल्याचं दिसत आहे.

बातमी अपडेट होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या