JOIN US
मराठी बातम्या / देश / दुर्देवी! लग्नाच्या बिऱ्हाडावर काळाचा घाला; नवरदेवाचा जागीच मृत्यू आणि...

दुर्देवी! लग्नाच्या बिऱ्हाडावर काळाचा घाला; नवरदेवाचा जागीच मृत्यू आणि...

संसार सुरू होण्यापूर्वीच कुटुंबावर मोठा आघात झाला आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कुशीनगर, 10 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये (Kushinagar) शुक्रवारी सायंकाळी एक अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. येथील एक तरुण लग्नानंतर पत्नीला घेऊन घरी परतत होता. त्यातच रस्ते अपघातात (Road Accident) त्याचा मृत्यू झाला. (Death) या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. काही वेळापूर्वी सौभाग्यवती झालेल्या काजलवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर मृतकाच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. पोलिसांनी नवरदेवाचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामकोला भागातील धर्मसमधा दुर्गा मंदिरात लग्न करुन घरी परतत असताना कुटुंबाचा रामकोला-कसया मार्गावर झालेल्या अपघातात नवरदेवाचा मृत्यू झाला. अमवा मंदिराच्या जवळ टॅम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाला. नवरदेव या टॅम्पोमध्ये होता. अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात नवरदेवाची आई जखमी झाली आहे. जखमी आईला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी नवरदेवाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आला आहे. हे ही वाचा- ‘बाबा, माझं अपहरण झालं, 10 लाख रुपये मागितले’ मुलाच्या फोनमुळे घडले नाट्य, आणि.. मिळालेल्या माहितीनुसार, धनौजी निवासी धर्मेंद्र (22) याचं लग्न देवरिया जिल्हा तरकुलवामधील सोनहुला रामनगर निवासी काजल (20) हिच्यासोबत ठरलं होतं. दोन्ही कुटुंबाच्या परवानगीनंतर धर्मसमधा मंदिरात यांचं लग्न लावण्यात आलं. दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत वर-वधुने एकमेकांना हार घातला. लग्नानंतर शुक्रवारी सायंकाळी धर्मेंद्र आपल्या पत्नी, आई व भावासोबत टँम्पोमधून निघाला. रामकोला-कसला मार्गावर अमवा मंदिराजवळ पोहोचल्यावर टॅम्पो अनियंत्रित होऊन खड्ड्यामुळे पलटला. हे ही वाचा- लज्जास्पद! बैठकीत सगळ्यांना बसायला खुर्च्या, दलित महिलेला मात्र जमिनीवर बसवलं नवरदेवाची आई गंभीर जखमी नवरदेव धर्मेंद्र याचा जागीच मृत्यू झाला. आणि या अपघातात नवरदेवाच्या आईच्या पायाला दुखापत झाली आहे. घटनास्थळी असलेल्यांनी रामकोला सीएचसी रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी नवरदेव धर्मेंद्रला मृत घोषित केले. जखमी विद्यावती देवा हिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, धर्मेंद्र याचा मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठविले आहे. पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या