छत्तीसगड, 31 जानेवारी : छत्तीसगडमधील (chhattisgarh) सुकमा (sukma) जिल्ह्यात माओवाद्यांचा (maoist) मोठा कट सीमा सुरक्षा दलाच्या (CRPF) जवानांनी उधळून लावला आहे. जवानांना जखमी करण्यासाठी माओवाद्यांनी तब्बल 27 खड्डयात 394 स्पाईक होल्स पेरुन ठेवले होते. छत्तीसगडमधील माओवादीग्रस्त भागात गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. आता सुद्धा जवानांवर मोठा हल्ला करण्याची तयारी या माओवाद्यांनी रचली होती. पण, वेळीच जवानांनी त्यांचा हा कट उधळून लावला आहे.
सुकमा जिल्ह्यातील पोलमपल्ली ते पलमडगु दरम्यान रस्त्यावर पेरुन ठेवले जीवघेणे स्पाईक होल्स समोर आले आहे. मोआवाद्यांनी तब्बल 27 खड्डयात 394 स्पाईक होल्स पेरुन जवानांना जखमी करण्याची कट रचला होता. जवानांच्या बॉम्बनाशक पथकाने वेळीच हे सर्व बॉम्ब शोधूनकाढले त्यामुळे पुढील मोठा अनर्थ ठळला. गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांच्या कारवाया वाढल्यामुळे सीआरपीएफच्या जवानांनी खबरदारी घेत पोलमपल्ली ते पलमडगु भागात शोधमोहिम हाती घेतली होती. कोणतीही चूक महागात पडू शकते म्हणून जवानांकडून संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे. त्याच शोधमोहिमेदरम्यान हा प्रकार समोर आला. दोन गावकऱ्यांची हत्या काही दिवसांपूर्वी माओवाद्यांनी छत्तीसगडच्या हद्दीतील मोरपानी या गावातील रामसाय गाडवे या नागरिकाची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केली होती. तर तिथून जवळच असलेल्या कामखेडा येथील 75 वर्षे वयाच्या इंदरसाय मंडावीची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली होती. या दोन्ही नागरिकांवर पोलिसांचा खबरी असल्याचा संशय घेऊन माओवाद्यांनी हत्या केली होती.