JOIN US
मराठी बातम्या / देश / इतर धार्मिक स्थळांना नाही मग इथेच नियम का? न्यायालयानं निजामुद्दीन मरकजमध्ये नमाजसाठी दिली परवानगी

इतर धार्मिक स्थळांना नाही मग इथेच नियम का? न्यायालयानं निजामुद्दीन मरकजमध्ये नमाजसाठी दिली परवानगी

निजामुद्दीन मरकजमध्ये (Nizamuddin Markaz) नमाज पठणसाठी परवानगी देण्यात आली आहे. न्य़ायालयानं म्हटलं, की इतर धार्मिक स्थळांसाठी किती संख्येनं भाविकांनी उपस्थित राहावं यासाठी काही नियम नाही तर हा नियम मरकजसाठीही नसेल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 13 एप्रिल : निजामुद्दीन मरकजमध्ये (Nizamuddin Markaz) नमाज पठणसाठी परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं (Delhi High Court) परवानगी देण्यासोबतच असा सवालही केला, की इतर धार्मिक स्थळांसाठी भाविकांची संख्या ठरवली गेली नाही किंवा तसा काही नियम नाही. अशात केवळ मरकजसाठी असा नियम का? न्य़ायालयानं म्हटलं, की इतर धार्मिक स्थळांसाठी किती संख्येनं भाविकांनी उपस्थित राहावं यासाठी काही नियम नाही तर हा नियम मरकजसाठीही नसेल. मरजकमध्ये आता रमजानच्यावेळी पाचवेळा नमाज पठण करता येणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्राची आणि दिल्ली पोलिसांची ती मागणी फेटाळली आहे, ज्यात एकावेळी केवळ वीस लोकांना आतमध्ये जाण्यास परवानगी देण्यास म्हटलं गेलं होतं. याप्रकरणी सुनावणी करताना न्यायाधीश मुक्त गुप्ता म्हणाल्या, की मरकजमध्ये नमाज पठण करण्याची परवानगी दिली गेली आहे. न्यायालयानं आदेशात म्हटलं, की रमजानचा महिना सुरु होत आहे, याच पार्श्वभूमीवर मरजकमध्ये पाच वेळचा नमाज पठण करण्याची परवानगी दिली जात आहे. मात्र, लोकांना सूचनांचं पालनही करावं लागेल. Kumbh Mela 2021: नियमांचा फज्जा, कुंभमेळ्यातील 102 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह दिल्ली वक्फ बोर्डाचे चेअरमन आणि आप आमदार अमानतुल्लाह खान यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर बोलताना त्यांनी म्हटलं, की आता मरकजचे टाळे खोलण्यात येतील आणि आधीप्रमाणंच पाच वेळचं नमाज पठण करण्यात येईल. मागील वर्षी तबलीगी जमातच्या कार्यक्रमानंतर मरकजमध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून आले होते. याशिवाय कोरोना नियमांचं उल्लंघन करत कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोपही यावेळी झाला होता. यानंतर एकच गोंधळ झाल्यानं मागील वर्षी 31 मार्चपासून मरकज बंद होते. आता हे पुन्हा एकदा खुले होणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या