JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / बिहारच्या मुंगेरमधील 'या' पुलाचं 25 डिसेंबरला लोकार्पण; वाजपेयी-नीतीश यांच्या कनेक्शनची होतेय चर्चा, पाहा PHOTOS

बिहारच्या मुंगेरमधील 'या' पुलाचं 25 डिसेंबरला लोकार्पण; वाजपेयी-नीतीश यांच्या कनेक्शनची होतेय चर्चा, पाहा PHOTOS

आता 25 डिसेंबर रोजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवसानिमित्त मुंगेर रेल्वे-कम-रोड पुलावरून गाड्या धावण्यास सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार करणार आहेत. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे या मुंगेर रेल्वे-कम-रोड पुलाशी खूप घट्ट नातं आहे. त्यामुळंच आता याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय मंत्री गडकरी करणार नाही तर मुख्यमंत्री नितिश कुमार करणार आहे. पाहा PHOTOS

0108

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या पुलाचे उद्घाटन करणार असल्याची माहितीही नितीन नवीन यांनी दिली. त्याचवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात
0208

2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या काळात या पुलाचे काम सुरू झाले होते, त्यावेळी माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार मंत्री होते. गेल्या 19 वर्षात मोठ्या उलथापालथीनंतर हे काम आता पूर्णत्वास जात आहे. त्यामुळं आता 25 डिसेंबर रोजी अटलजींच्या जयंतीदिनी या पुलाचे उद्घाटन करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे.

जाहिरात
0308

या पुलाचा आढावा घेण्यासाठी बिहारचे रस्ते बांधकाम मंत्री नितीन नवीन बुधवारी मुंगेरला पोहोचले होते आणि त्यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत या पुलाचं उद्घाटन 25 डिसेंबरला करण्यात येणार आहे.

जाहिरात
0408

हा प्रकल्प सुमारे 19 वर्षांपासून रखडल्याने त्याची किंमत जवळपास तिप्पट वाढली आहे. यापूर्वी हा खर्च सुमारे 921 कोटी रुपये होता, तो वाढून सुमारे 2774 कोटी रुपये झाला आहे. हा गंगा रेल्वे-कम-रोड प्रकल्प पूर्ण झाल्यावर बेगुसराय आणि खगरिया हे अंतर मुंगेरपेक्षा खूपच कमी होईल. मुंगेर ते खगरिया आणि बेगुसराय हा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होईल.

जाहिरात
0508

नुकतंच रस्ते बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या जमिनीच्या संपादनासाठी विशेष पुढाकार घेतला होता. काही महिन्यांपूर्वी बिहार मंत्रिमंडळाने राज्य सरकारनं विशेष पॅकेज अंतर्गत 57 कोटी रुपये देऊन भूसंपादनाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता.

जाहिरात
0608

25 डिसेंबर 2021 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसादिवशी याचं उद्घाटन होणार असून त्यावरून वाहतूक सुरू होणार आहे.

जाहिरात
0708

या पुलाला बनवण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना प्रशासनाला करावा लागला. प्रशासनाच्या मध्यस्थीने हरियाणातील एसपी सिगला या कंपनीने जुन्या संपादित जमिनीवर रस्ता बांधणीचे काम सुरू केले.

जाहिरात
0808

आता या योजनेला 18 वर्ष पूर्ण होत असतानाही अद्याप पूलाचं काम संपूर्णरित्या पूर्ण झालेलं नाही. परंतु पुलाच्या उत्तर किनार्‍यापासून NH 31 हिराटोलपर्यंत 5.133 किलोमीटरचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या