JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / UP Election 2022 : पूर्वांचल ते पश्चिम भागात वर्चस्व राखण्यासाठी BJPचा मास्टरप्लान, पाहा PHOTOS

UP Election 2022 : पूर्वांचल ते पश्चिम भागात वर्चस्व राखण्यासाठी BJPचा मास्टरप्लान, पाहा PHOTOS

PM Modi on UP Election Mission : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर PM Narendra Modi यांनी पूर्वांचलपासून पश्चिमेपर्यंत कामाचा आणि उद्घाटनाचा धडाका लावलेला आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे असतील. शाहजहांपूर येथून पंतप्रधान उत्तर प्रदेश निवडणुकीत देशातील सर्वात मोठ्या गंगा एक्सप्रेस वेची पायाभरणी करून मोठी भेट देणार आहेत.

0105

यूपीतील शाहजहांपूर येथून पंतप्रधान मोदी उत्तर देशातील सर्वात मोठ्या गंगा एक्सप्रेस वे ची पायाभरणी करून देशाला मोठी भेट देणार आहेत. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाची शाहजहांपूरमध्ये जोरदार तयारी सुरू आहे.

जाहिरात
0205

शाहजहांपूरच्या रेल्वे मैदानावर पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमासाठी स्टेज सज्ज असून कार्यक्रमस्थळी सुरक्षा दल तैनात करण्यात आलेले आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी भाजपच्या स्थानिक नेत्यांची आहे. मेरठपासून सुरू होणारा हा गंगा एक्सप्रेस वे उत्तर प्रदेशातील 12 जिल्ह्यांतून प्रयागराजपर्यंत पोहोचेल.

जाहिरात
0305

Ganga Express way हा उत्तर प्रदेशच्या पश्चिम आणि पूर्वेकडील प्रदेशांना जोडणारा राज्यातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग असेल जो मेरठ, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बदायूं, शाहजहांपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराज येथे जाईल.

जाहिरात
0405

गंगा द्रुतगती मार्गावर शाहजहांपूर येथे 3.5 किमी लांबीची धावपट्टी तयार केली जाणार आहे त्यामुळं हवाई दलाच्या विमानांना आपत्कालीन परिस्थितीत टेक ऑफ आणि लँडिंग करण्यास मदत होईल. एक्स्प्रेस वे च्या बाजूला इंडस्ट्रियल कॉरिडॉर बनवण्याचाही प्रस्ताव आहे. या एक्स्प्रेस वे मुळं औद्योगिक विकास, व्यापार, कृषी, पर्यटन या क्षेत्रांना चालना मिळणार आहे.

जाहिरात
0505

रॅलीच्या ठिकाणी पोहोचण्यात आणि नंतर परत जाण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती यूपी पोलिस दलातील ADT अविनाश चंद्र यांनी दिली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या