श्रीनगर, 21 जुलै: जम्मू काश्मीरच्या ( Jammu and Kashmir ) अनंतनागमध्ये (Verinag, Anantnag) पुन्हा एकदा पोलीस दलात तैनात असलेल्या कॉन्स्टेबलच्या कुटुंबियांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी कॉन्स्टेबलच्या त्याच्या पत्नी आणि मुलीवर (wife & daughter of a police constable) हल्ला केल्याचं समजतंय. सज्जाद अहमद असं कॉन्स्टेबलचं नाव असून जम्मू काश्मीर पोलीस ( Jammu and Kashmir Police) दलातील कोकागुंड वेरीनाग क्षेत्रात तैनात आहे. या गोळीबारात दोन्ही महिला गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हल्ला करणाऱ्यांमध्ये जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे. मुफ्ती अल्ताफ (Mufti Altaf) असं या दहशतवाद्याचं नाव असल्याचं समजतंय.
मंगळवारी संध्याकाळी श्रीनगरच्या डाऊनटाऊन भागात पोलिसांच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर त्यांनी कॉन्स्टेबलसह त्यांच्या कुटुंबियांना ट्रागेट करत त्यांच्यावर हल्ला चढवला. या दहशतवाद्यांचा सध्या शोध सुरु आहे.