हैदराबाद, 18 ऑक्टोबर : महाराष्ट्रात महापुरामुळे मोठं संकट ओढवलं. शेतकऱ्यांची पिकं जमीनदोस्त झाली तर अनेक गावांमध्ये नद्या-ओढ्यांचं पाणी भरल्यानं आलेल्या पुरात होते नव्हते ते संसारही वाहून गेले. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आणि अनेक गाड्या अडकल्या. काही गाड्या वाहून गेल्या तर काही ठिकाणी गाड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे रस्त्यात अडकून पडल्या होता. तर काही ठिकाणी पोलिसांनी या गाड्यांना पाण्यातून वाट करून दिली. महाराष्ट्रच नाही तर हैदराबाद, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही गावांमध्ये झालेल्या कोसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तेलंगणामध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आणि गाड्या अडकल्या. दरव्याजे लॉक होण्याइतकं पाणी भरायला लागल्यामुळे अखेर जेसीबीनं गाड्या पुरातून गाड्या बाहेर काढायची वेळ आहे. इतकच नाही काही ठिकाणी पोलिसांनी गाड्यांना पाण्यातून वाट करून दिली आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हे वाचा- हेलिकॉप्टरमधून उतरताच शरद पवारांनी पहिले कार्यकर्त्यांना बजावले, पाहा हा VIDEO पहिल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कार अडकलेली आहे आणि ती काढण्यासाठी जेसीबीची मदत घेतली जात आहे तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी आणि काही तरुण बंद पडलेल्या आणि पुरात अडकलेल्या गाड्यांना वाट दाखवत आहेत. रस्त्यावरून पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवत आहेत. तेलंगणामध्ये गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे अत्यंत भीषम पूरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. डौलात उभी असलेली पिकं जमीनदोस्त झाली. आधी लॉकडाऊन आणि आता आस्मानी संकट त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात वाहून गेली आहेत. संपादन- क्रांती कानेटकर