JOIN US
मराठी बातम्या / देश / 'फक्त 2 औषधं घेतली आणि कोरोना बरा झाला', मुख्यमंत्र्यांचा दावा

'फक्त 2 औषधं घेतली आणि कोरोना बरा झाला', मुख्यमंत्र्यांचा दावा

कोरोनाची (covid-19) भीती ही मीडियाने वाढवली. आपण फक्त दोन प्रकारची औषधं घेतली आणि कोरोनामधून बरे झालो असा दावा मुख्यमंत्री पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीने केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 23 जून : गेल्या दोन वर्षांपासून सारं जग कोरोनाचा (covid-19) सामना करत आहे. भारतामध्ये तर सलग दोन वर्ष यामुळे लॉकडाऊन लावण्याची पाळी आली. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी लसीकरण (vaccination) कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. तरी देखील सध्या संपूर्ण देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहे. हे सर्व विनाशकारी रुप  सर्वांनी अनुभवल्यानंतरही कोरोनाची भीती ही मीडियाने वाढवली. आपण फक्त दोन प्रकारची औषधं घेतली आणि कोरोनामधून बरे झालो असा दावा मुख्यमंत्री पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीने केला आहे. तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी मीडियाने कोरोनाबात संभ्रम निर्माण केला आणि लोकांमध्ये भीती पसरवली असा आरोप केला आहे. चंद्रशेखर राव यांना एप्रिल महिन्यात कोरनाची लागण झाली होती. त्यावेळी आपण पॅरासिटामॉल (paracetamol) आणि अँटिबायोटीक औषधे खाऊन बरे झालो असा दावा राव यांनी केला आहे. चंद्रशेखर राव यांनी एका कार्यक्रमात बोलताना कोरोनासह फंगस (fungus) बद्दल देखील वक्तव्य केले. “कोणती वाहिनी किंवा पेपर आहे माहिती नाही पण ते ब्लॅक फंगस आणि यलो फंगसबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. हा फंगस जिवंत आहे की निर्जीव हे देखील लोकांना माहिती नाही. पण लोकं भीतीने मरत आहेत. या टीव्ही मीडियाच्या लोकांना शाप लागेल.”

संबंधित बातम्या

राव यांनी यावेळी त्यांचा कोरोनाचा अनुभव देखील सांगितला. “आपल्याला डॉक्टरांनी फक्त दोन प्रकारच्या गोळ्या दिल्या. त्या घेऊन मी आठवडाभरात बरा झालो. मीडिया लोकांमध्ये भीती निर्माण करत आहे. त्यांना भीती निर्माण करण्याची गरज काय आहे?” असा सवाल राव यांनी विचारला. धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, आई-वडिलांनी मुलांसह संपवला जीव “माध्यमं चुकीच्या पद्धतीने परिस्थिती मांडत आहेत. कोरोना नसतानाही सरकारी रुग्णालयामध्ये जागा मिळत होती का? डॉक्टर कधीही रुग्णांना उपचार नाकारत नाहीत. गरिबांवर फक्त सरकारी रुग्णालयामध्येच उपचार होतात हे त्यांना माहिती आहेत. ते रुग्णांना जमिनीवीर बसवतात. तर मीडियामध्ये त्यांचे फोटो दाखवून रुगणांना जमिनीवर झोपायला लावले, असा दावा केला जातो.” असा आरोप चंद्रशेखर राव यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या