सूरत, 09 मार्च: एका अपघाताची बातमी समोर येत आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना सूरत येथील वडोदरामध्ये घडली (Vadodara in Surat) आहे. सिटी बसनं एका तरुणीला मागून येऊन धडक दिली. ज्यात त्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरत शहर बसची धडक बसल्यानं तरुणीचा मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 25 वर्षीय शिवानी सोलंकी असं मृत तरुणीचं नाव आहे.
धडक बसल्यानं सुरत येथील शिवानी आधी जखमी झाली. अपघातानंतर तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र जखमी शिवानी सोलंकी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवानी Msc च्या शेवटच्या वर्षांत शिकत होती. हा अपघात जनमहाल सिटी बस डेपो येथे घडला आहे. या अपघाताचा व्हिडिओ पाहून सर्वच जण हळहळ व्यक्त करत आहेत.