JOIN US
मराठी बातम्या / देश / Abu Salem Case : मुंबई बाॅम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम 2030 पर्यंत जेलमध्येच राहणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Abu Salem Case : मुंबई बाॅम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम 2030 पर्यंत जेलमध्येच राहणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

1993 मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेमची 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतरच सुटका करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे. त्यामुळे 2027 ऐवजी 2030 पर्यंत अबू सालेम तुरुंगातच राहणार आहे.

जाहिरात

अबू सालेम

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

1993 च्या मुंबई बाॅम्बस्फोटातील (Mumbai blasts) गॅंगस्टर अबू सालेमला (Abu Salem) सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सांगितले की, 25 वर्षांची त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणावर निर्णय घेतला जायला हवा. त्यामुळे अबू सालेम आता 2027 मध्ये तुरुंगातून सुटणार नाही, 2030 मध्येच अबू सालेमची  तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. (Abu Salem, accused in Mumbai blasts, to be released from jail in 2030) वाचा :  BREAKING : शिंदे गटाला मानाचे पान, एनडीएच्या बैठकीला दिल्लीतून निमंत्रण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणार सांगितले की, 1993 च्या मुंबई बाॅम्बस्फोटातील गॅंगस्टर अबू सालेची 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारने पोर्तुगाल सरकारला दिलेल्या वचनानुसार अबू सालेमची तुरुंगातून सुटका करण्यास भारत सरकार बांधील आहे. सालेमने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिक म्हटले होते की, “2002 मध्ये भारताने पोर्तुगालला त्याच्या प्रत्यार्पणासाठी दिलेल्या आश्वासनानुसार त्याची शिक्षा 25 वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही”, असे सालेमने म्हटले होते. वाचा :  रिझर्व्ह बँकेची तीन बँकांवर मोठी दंडात्मक कारवाई, तुमचंही ‘या’ बँकांमध्ये खातं आहे का? 25 फेब्रुवारी 2015 मध्ये स्पेशल टाडा कोर्टाकडून आणखी एका प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा 1995 साली मुंबईचे बिल्डर प्रदीप जैन आणि त्याचे ड्रायव्हक मेंहदी हसनच्या हत्येच्या प्रकरणात दिलेली होती. सालेम हा 1993 च्या मुंबई बाॅम्बस्फोटमध्येही दोषी होता. सालेमला 11 नोव्हेंबर 2005 मध्ये पार्तुगालशी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सालेम भारत सरकारने ताब्यात घेतलेला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या