इंदूर,ता.12 जून : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची सुसाईड नोट सापडली आहे. त्यातून ते अतिशय तणावात आणि निराशेत असल्याचं स्पष्ट होतं. कुटूंबाचा सांभाळ करण्यासाठी कुणालातरी जबाबदारी द्या. मी आता सोडून जात आहे. मी निराश झालोय. असं भय्यूजी महाराजांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते निराश होते अशीही माहिती आहे. त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक कार्याचा व्याप प्रचंड वाढल्याने त्यांच्यावर मोठं कर्ज झालं होतं अशीही माहिती आहे. हा सर्व डोलारा सांभाळणं त्यांना अवघड गेलं. त्यामुळं ते अस्वस्थ होते अशी माहिती आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय हे मात्र अजुनही गुढ आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करणार आहे. त्यानंतरच खरी माहिती बाहेर येणार आहे. आज सकाळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते 50 वर्षांचे होते.
अाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या
भय्यूजी महाराजांचा अल्पपरिचय
फोटो गॅलरी : पंतप्रधान मोदी ते सेलिब्रेटींसोबत भय्यूजी महाराज