JOIN US
मराठी बातम्या / देश / PSLV-C52 च्या माध्यमातून रडार इमेजिंग सॅटेलाईटचं लाँचिंग यशस्वी

PSLV-C52 च्या माध्यमातून रडार इमेजिंग सॅटेलाईटचं लाँचिंग यशस्वी

आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील पहिल्या लाँचपॅडवरून PSLV च्या माध्यमातून एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट (Earth Observation Satellite) अर्थात पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-04 आणि इस्रोचे अन्य दोन सॅटेलाईट (Satellite) लाँच करण्यात आले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) अर्थात इस्रोने (ISRO) 2022 या वर्षातला पहिलं पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल सी52 रॉकेट लाँच केलं आहे. आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील पहिल्या लाँचपॅडवरून PSLV च्या माध्यमातून एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट (Earth Observation Satellite) अर्थात पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-04 आणि इस्रोचे अन्य दोन सॅटेलाईट (Satellite) लाँच करण्यात आले. EOS-04 हा कृषी, वनीकरण, वृक्षारोपण, जलविज्ञान आदी गोष्टींच्या अ‍ॅप्लिकेशन्ससाठी तसेच सर्व प्रकारच्या हवामानातील उत्तम दर्जाचे फोटो पाठवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसंच अन्य एका सॅटेलाईटच्या माध्यमातून पाणथळ प्रदेश, जमिनीच्या पृष्ठभाग, तसेच तलावांच्या पाण्याच्या पृष्ठभागासह विविध गोष्टींच्या तापमानाचा अंदाज घेणं शक्य होणार आहे. `इस्रो`ने दिलेल्या माहितीनुसार, PSLV-C52 हा एका अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटच्या कक्षेत परिभ्रमण करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. त्याचे वजन 1710 किलो आहे आणि तो 529 किलोमीटर अंतरावरील सन-सिंक्रोनस पोलर ऑर्बिटमध्ये (Sun-synchronous polar orbit) आहे. दोन छोटे सॅटेलाईटही पाठवलं PSLV-C 52 मिशनच्या माध्यमातून दोन छोटे सॅटेलाईटही को-पॅसेंजर म्हणून पाठवण्यात आले आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो, बॉल्डरची लॅबोरेटरी ऑफ अ‍ॅटमॉस्फेरिक अँड स्पेस फिजिक्सच्या भागीदारीतून भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचा एक स्टुडंट सॅटेलाइट (INSPIREsat-1) आणि इस्रोच्या एका टेक्नोलॉजी डेमॉन्सट्रेटर सॅटेलाईट यामाध्यमातून लॉंच करण्यात आले आहेत. EOS-04 हा आहे रडार इमेजिंग सॅटेलाईट EOS-04 हा एक रडार इमेजिंग सॅटेलाईट (Radar imaging satellite) असून, प्रत्येक हवामान स्थितीतले उत्तम दर्जाचे फोटोज् पाठवण्यासाठी आणि कृषी, वनीकरण आणि वृक्षारोपण, मातीतला ओलावा, जलविज्ञान आणि पूर मॅपिंग यांसारख्या अ‍ॅप्लिकेशन्स साठी हा डिझाईन करण्यात आला आहे. या सॅटेलाईटवरील दोन सायंटिफिक पेलोडसचे उद्दिष्ट आयनोस्फीअर डायनॅमिक्स आणि सूर्याच्या कोरोनल हीटिंग प्रक्रिया अधिक सविस्तरपणे समजून घेणे असा आहे. त्याचवेळी दुसरा सॅटेलाईट इस्रोचा टेक्निकल डेमॉन्स्ट्रेटर सॅटेलाईट (INS-2TD) असून, तो भारत-भूतानचा संयुक्त सॅटेलाईटची (INS-2B)पुढील आवृ्त्ती आहे. एका थर्मल इमॅजिंग कॅमेरामुळे या सॅटेलाईटच्या माध्यमातून जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान, पाणथळ प्रदेश किंवा तलावांच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान, वनस्पती (पिकं आणि जंगलं) तसेच थर्मल अर्थात औष्णिक जडत्व (दिवस आणि रात्र) यांचा अंदाज घेणं शक्य होणार आहे. PSLV चे हे 54 वे उड्डाण आहे आणि 6PSOM-XL (स्ट्रॅप ऑन मोटर्स) सह PSLV-XL कॉन्फिगरेशन वापर करून केलेली ही 23 वी मोहिम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या