JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Snowfall Photos : भारत-चीन सीमेवर बर्फवृष्टी; रस्ते ठप्प, नद्या गोठण्याच्या मार्गावर

Snowfall Photos : भारत-चीन सीमेवर बर्फवृष्टी; रस्ते ठप्प, नद्या गोठण्याच्या मार्गावर

Snowfall in Uttarakhand : उत्तराखंडसह भारत आणि चीन सीमेवर तुफान बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत असून रस्ते बंद पडलेले आहेत. त्याचबरोबर नद्या आणि तलावातील पाणी गोठले जात आहेत.

0105

रस्त्याच्या एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर. दरी, नदी असो, डोंगर असो, सगळीकडे बर्फच पसरलेला आहे. रस्त्यावर जाड बर्फाची चादर परसत आहे. हे फोटो भारत-चीन सीमेवरील शेवटचं गाव असलेल्या गमशालीचे आहेत. आता तिथे लष्कराची वाहनं येणं कठीण झालं आहे.

जाहिरात
0205

भारत-चीन सीमेला जोडणाऱ्या रस्त्यावर एवढा बर्फ पडला आहे, की लष्कराची मोठी वाहनंही सीमाभागात जाऊ शकत नाहीत. बर्फाच्या जाड चादरीमुळे संपूर्ण रस्ता दगडासारखा कठीण झाला आहे, तो साफ करण्यात बीआरओ कर्मचारी आणि अधिकारी हतबल झालेले आहेत.

जाहिरात
0305

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या रस्त्यावरील बर्फाचा जाड थर हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र मशिनच्या साहाय्यानेही तो काढणं कठीण होत आहे.

जाहिरात
0405

थंडीचा कडाका इतका वाढला आहे की येथून वाहणारी धौली नदी गोठण्याच्या मार्गावर आहे.

जाहिरात
0505

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या हिमवृष्टीनंतर सातत्याने थंडी पडत आहे. त्यामुळे सीमेचं रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांनाही त्याचा सामना करावा लागत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या