JOIN US
मराठी बातम्या / देश / मुस्लीमांसंदर्भातील वक्तव्य करणं भोवलं; ममता बॅनर्जींविरोधात निवडणूक आयोगाची नोटीस

मुस्लीमांसंदर्भातील वक्तव्य करणं भोवलं; ममता बॅनर्जींविरोधात निवडणूक आयोगाची नोटीस

निवडणूक आचार संहिता उल्लंघन (Model Code Of Conduct) प्रकरणात निवडणूक आयोगाने (EC) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banrejee) यांना नोटीस (Notice) पाठवली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 एप्रिल : निवडणूक आचार संहिता उल्लंघन (Model Code Of Conduct) प्रकरणात निवडणूक आयोगाने (EC)  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banrejee) यांना नोटीस (Notice) पाठवली आहे. ममता दीदींनी हुगळीत मुस्लीम मतदारांना आपल्या मतांचं विभाजन न करण्याची अपील केली होती. ममता बॅनर्जी मुस्लीम मतदारांना अपील करीत म्हणाल्या की, त्यांनी विविध पक्षांमध्ये आपल्या मतांचं विभाजन होऊ देऊ नये. निवडणूक आयोगानुसार ममता बॅनर्जींनी निवडणूक आचार संहितेच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. यासाठी त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून येत्या 48 तासात उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. हे ही वाचा- ‘मतदान केंद्रावर कोणतीही हिंसा नाही’; ममता बॅनर्जींचे आरोप EC नं फेटाळले केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेता मुख्तार अब्बास नकवी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती आणि निवडणूक आचार संहितेअंतर्गत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. ममता बॅनर्जी यांनी 3 एप्रिल रोजी हुगळीमध्ये मुस्लीम मतदारांबाबत वक्तव्य केलं होतं. ममता बॅनर्जी नंदीग्राममधून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर बंगालमधील निवडणूक रॅलीदरम्यान टिप्पणी केली होती. नंदीग्राममध्ये मतदानाच्या दिवशी मतदारांना धमकी देण्याच्या ममता बॅनर्जी यांचे आरोप चुकीचे होते आणि निवडणूर आयोगाने मुख्यमंत्र्यांकडून अशा चुकीच्या आरोपांबाबत निराशा व्यक्त केली होती. निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात दिल्यानुसार आयोग या प्रकरणाचा तपास करीत आहे. या आरोपांवर निवडणूक आचार संहितेअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या