JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी; जमिनीवर पसरलीये पांढरी चादर, पाहा PHOTOS

हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी; जमिनीवर पसरलीये पांढरी चादर, पाहा PHOTOS

Snowfall in Himachal : हिमाचल प्रदेशातील शिमला, मनाली, खज्जियार आणि लाहौलमध्ये जोरदार हिमवर्षाव झाला आहे. त्यामुळे हिमाचलमधील बहुतांश भागात पांढरी चादर पसरली आहे. मात्र, बर्फवृष्टीमुळे लेह मनाली महामार्ग बंद पडला असून त्यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाहा PHOTOS

0108

हिमाचल प्रदेशातील शिमला, मनाली, खज्जियार आणि लाहौलमध्ये झालेल्या या हिमवर्षावामुळं हॉटेल व्यावसायिकांसह राज्यातील पर्यटक आणि बागायतदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

जाहिरात
0208

चंबा जिल्ह्यातील भरमौर येथे हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. त्याचबरोबर चौरासी, मणिमहेशसह सर्व उंच भागांमध्येही बर्फवृष्टी झाली आहे.

जाहिरात
0308

प्रसिद्ध पर्यटन स्थळ खज्जियारमध्येही हलकी बर्फवृष्टी झाली आहे. मिनी स्वित्झर्लंड असलेल्या खज्जियारमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर तिथं पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0408

शिमला जिल्ह्यातील नारकंडा येथे बर्फवृष्टी झाली आहे. हा फोटो शिमल्याच्या नारकंडा येथील मधोग गावाचे आहे.

जाहिरात
0508

मनाली शहरातही मोसमातली पहिली बर्फवृष्टी झाली आहे. सध्या अटल बोगद्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची ये-जा बंद करण्यात आली आहे.

जाहिरात
0608

शुक्रवारी रात्री अटल बोगद्याजवळही बर्फ पडला होता. त्यामुळं आता प्रशासनानं पर्यटकांना हा बोगदा पाहण्यासाठी बंदी केली आहे.

जाहिरात
0708

किन्नौर जिल्ह्यातही बर्फवृष्टी झाली आहे. संपूर्ण घाटी थंडीच्या लाटेने ग्रासली आहे. येथे बागायतदारांना आणि सफरचंद पिकाला या बर्फवृष्टीचा फायदा होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0808

लाहौलमध्ये सतत बर्फवृष्टी होत आहे. सध्या लेह मनाली हायवे बंद आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळे लाहौलमधील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या