JOIN US
मराठी बातम्या / देश / Solar Storm: पृथ्वीवर आज सौर वादळ धडकणार? वीज, मोबाईल नेटवर्क ठप्प होण्याची शक्यता

Solar Storm: पृथ्वीवर आज सौर वादळ धडकणार? वीज, मोबाईल नेटवर्क ठप्प होण्याची शक्यता

सौर वादळांना भूचुंबकीय वादळे आणि सौर वादळे असेही म्हणतात. हे वादळ म्हणजे सूर्यापासून निघणारा एक प्रकारचा किरणोत्सर्ग आहे, त्यामुळे उष्णता वाढते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 ऑगस्ट : सोलार सिस्टम अर्थात सौरमाला हा नेहमीच शास्त्रज्ञ आणि अवकाश संशोधकांसाठी शोधाचा विषय राहिला आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या हालचालींवर अनेक शास्त्रज्ञ लक्ष ठेवून असतात. सौर वादळ अवकाश शास्त्रज्ञांसाठी नेहमीच चिंतेचा विषय आहे. सौर वादळाबाबत आता नवा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार पृथ्वीवर मोठा धोका निर्माण झाला आहे. सूर्याच्या वातावरणातील छिद्रातून वेगाने जाणारे सौर वारे आज 3 ऑगस्ट रोजी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला टक्कर देऊ शकतात. सौर वादळ सूर्याला आदळण्यापासून वाचलं आहे, परंतु आता ते पृथ्वीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर हे सौर वादळ पृथ्वीवर आदळले तर त्यामुळे संपूर्ण जगात काळोख होऊ शकतो. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ब्लॅकआउट व्यतिरिक्त इतरही धोके तज्ज्ञांच्या मते, जर सौर वादळ पृथ्वीवर आदळले तर ब्लॅकआऊटच नाही तर इतर अनेक प्रकारच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. असे झाले तर जगभरातील रेडिओ सिग्नल अडचणीत येऊ शकतात. यामुळे रेडिओच्या ऑपरेशनमध्ये समस्या उद्भवू शकतात. रेल्वे कर्मचारी स्वत:च्या कारने ड्युटीवर आल्याने वरिष्ठांकडून नोटीस, रेल्वेचा नियम काय आहे? तसेच जीपीएस वापरण्यावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, याचा सर्वात मोठा आणि वाईट परिणाम मोबाईल फोनच्या सिग्नलवर होऊ शकतो. त्यामुळे जगातील मोबाइल नेटवर्क व्यवस्था ठप्प होऊ शकते. अशा सर्व संकटांची शक्यता पाहता या वादळाबाबत अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. सौर वादळ काय आहे? सौर वादळांना भूचुंबकीय वादळे आणि सौर वादळे असेही म्हणतात. हे वादळ म्हणजे सूर्यापासून निघणारा एक प्रकारचा किरणोत्सर्ग आहे, त्यामुळे  उष्णता वाढते. ज्याला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 15 ते 18 तास लागतात. खरंतर सौरवादळ येण्याच्या घटना अगदी क्वचित घडतात. सूर्याच्या पृष्ठभागावर वारंवार मोठे स्फोट होत असतात. मात्र, त्यातील काहीच स्फोट एवढे मोठे असतात ज्यातून सौरवादळ येण्याची शक्यता असते. कित्येक वेळा सूर्यापासून निघालेले रेडिएशन बऱ्याच वेळा पृथ्वीपर्यंत पोहोचते. मात्र, पृथ्वीच्या गाभ्यातून निघणाऱ्या चुंबकीय तरंगांमुळे पृथ्वीच्या भोवती एक प्रकारचं सुरक्षा कवच तयार झालेलं असतं; जे आपल्याला या रेडिएशनपासून वाचवतं. सौरवादळाच्या वेळी मात्र रेडिएशन अगदीच जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे हे कवच भेदले जाते. सौरवादळांमुळे शास्त्रज्ञांना सूर्याचा आणखी अभ्यास करणे शक्य होते. TOP Records! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महिलांनी केलेले हे विक्रम पुरुषांनाही आलेले नाहीत मोडता यापूर्वीही आले होते सौरवादळ पृथ्वीवर सौरवादळ (Solar Storm in past) धडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1989 साली आलेल्या एका सौरवादळाचा परिणाम कॅनडा देशातील क्युबेक शहरावर दिसून आला होता. त्यापूर्वी 1859 साली आलेल्या एका सौरवादळामुळे अमेरिका आणि युरोपातील टेलिग्राफ नेटवर्क बंद पडलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या