JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / PHOTOS: प्रसिद्ध रिज मैदानातील पाणी गोठलं! शिमल्यात जोरदार बर्फवृष्टीचे मिळाले संकेत

PHOTOS: प्रसिद्ध रिज मैदानातील पाणी गोठलं! शिमल्यात जोरदार बर्फवृष्टीचे मिळाले संकेत

Snowfall in Shimla : हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या शिमल्यात वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 18 डिसेंबरपर्यंत हवामान स्वच्छ राहील आणि त्यानंतर शिमल्यात जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पाहा PHOTOS

0107

हिमाचल प्रदेशातील शिमला शहर बर्फवृष्टीच्या प्रतीक्षेत आहे. या हंगामात पहिल्यांदाच बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0207

शिमल्यात खूप थंडी आहे. शहरातील रिज मैदानात महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली बांधलेल्या कारंज्यातील पाणी ही गोठलं आहे.

जाहिरात
0307

16 आणि 17 डिसेंबर रोजी शिमल्यात बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

जाहिरात
0407

शिमल्यात बुधवारी कमाल पारा 13.4 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 2.1 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. शिमल्यात बर्फवृष्टी होण्याची शक्यता असताना पर्यटकांची संख्या ही सातत्यानं वाढत आहे.

जाहिरात
0507

या हंगामात आतापर्यंत शिमला शहरात बर्फवृष्टी झालेली नाही. हवामान विभागाचे संचालक सुरेंद्र पाल यांनी सांगितलं की शिमल्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे आणि अशा परिस्थितीत 16 आणि 17 डिसेंबर रोजी शहरात बर्फवृष्टी होऊ शकते.

जाहिरात
0607

केलॉन्ग, कल्पा आणि मनालीचे किमान तापमान शिमल्याच्या तुलनेत मायनसमध्ये आहे. सोलन आणि डलहौसीमध्येही किमान पारा शून्यावर पोहोचला आहे.

जाहिरात
0707

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सक्रियतेमुळे राज्यातील हवामानात बदल होण्याचा अंदाज आहे. 18 डिसेंबरपासून हवामान स्वच्छ आणि शुभ्र राहण्याची शक्यता आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या