बॉलिवूडचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांची अभिनयाची कारकीर्द बहरली, तशी राजकीय कारकीर्दही लक्षणीय ठरली होती. पण त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि बिहारी बाबूंचं नशीब पालटलं. ते स्वतः आणि कुटुंबातल्या एकाही सदस्याला त्यानंतर एकही निवडणूक जिंकता आलेली नाही.
शत्रुघ्न सिन्हा यांची अभिनयाची कारकीर्द बहरली, तशी राजकीय कारकीर्दही लक्षणीय ठरली होती. पण त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि बिहारी बाबूंचं नशीब पालटलं.
शत्रुघ्न सिन्हा स्वतः काँग्रेसकडून रिंगणात उतरले आणि हरले. तसे त्यांचे कुटुंबीयही वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुका लढले पण त्यांना अद्याप विजय मिळवता आलेला नाही.
काँग्रेसचे लव सिन्हा यांचा भाजपचे उमेदवार नितीन नवीन यांनी पराभव केला. जवळपास 17 हजार मतांनी पराभव केला.
यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी देखील निवडणूक लढवली होती. त्यांनाही पराभव पत्करावा लागला होता.
शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि बिहारमधून लोकसभा निवडणूक लढवली. पण रविशंकर प्रसाद यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.
शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षाकडून उत्तर प्रदेशात लखनौची सीट लढवली. पण राजनाथ सिंह यांनी त्यांचा पराभव केला.