JOIN US
मराठी बातम्या / देश / COVID-19 2nd Wave: 100 दिवस टिकणार कोरोना विषाणूची दुसरी लाट, 70 टक्के लसीकरण अत्यावश्यक; तज्ज्ञांचा दावा

COVID-19 2nd Wave: 100 दिवस टिकणार कोरोना विषाणूची दुसरी लाट, 70 टक्के लसीकरण अत्यावश्यक; तज्ज्ञांचा दावा

Corona cases in India: देशात दररोज 2 लाखाहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद होतं आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढते आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus second wave) केव्हा ओसरणार याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 एप्रिल: भारतात सध्या कोरोना विषाणूचं संक्रमण (Corona pandemic) वेगाने होत आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सध्या देशात दररोज 2 लाखाहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची (Corona patients) नोंद होतं आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus second wave) केव्हा ओसरणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांच्या एका तज्ज्ञाने (Expert) तयार केलेल्या रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूची दुसरी लाट अजून 100 दिवस कायम राहू शकते. शिवाय देशातील 70 टक्के लोकांच लसीकरण पूर्ण होईपर्यंत किंवा लोकांच्या रोगप्रतिकार शक्तीचा स्तर उंचावण्यापर्यंत (हर्ड इम्युनिटी) अशा प्रकारच्या कोरोना विषाणूच्या लाटा येतचं राहतील, असा अंदाजही संबंधित तज्ज्ञाने वर्तवला आहे. हर्ड इम्युनिटीमुळे (Herd Immunity) लोकांना संसर्गजन्य रोगांपासून अप्रत्यक्ष संरक्षण मिळतं. लसीकरणानंतर किंवा संसर्गानंतर बरं झाल्यानंतर लोकांची प्रतिकारक शक्ती विकसित होते. लोकांच्या सामूहिक रोग प्रतिकारक शक्तीला हर्ड इम्यूनिटी म्हणतात. डॉ. नीरज कौशिक यांनी पुढे सांगितलं की, कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमध्ये लोकांची प्रतिकारक शक्ती कमी करण्यासोबतच लशीचा प्रभाव कमी करण्याची क्षमता देखील या विषाणूत आहे. (हे वाचा- Black Friday : रुग्णसंख्येचा विक्रम; घेतले 1340 बळी, 57 टक्के लोक घरांमध्ये कैद ) कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन पूर्वीच्या (New Strain of Coronavirus) कोरोना विषाणूपेक्षा अधिक संक्रामक आहे. त्यामुळे ज्या लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. अशा लोकांनाही कोरोना विषाणूचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. डॉ. कौशिक यांच्या मते, म्युटेटेड कोरोना विषाणू इतका संसर्गजन्य आहे, की तो जर घरातील एका व्यक्तीला झाला तर संपूर्ण कुटुंबही कोरोनाच्या विळख्यात सापडू शकतो. हा विषाणू लहान मुलांसाठी देखील घातक आहे. शिवाय हा विषाणू आरटी-पीसीआर सारख्या चाचण्यांमध्ये देखील सापडत नाहीये. तथापि, वास न येणं कोरोना विषाणूची लागण झाल्याचं एक मोठा संकेत आहे. (हे वाचा- जगाला लसीचा पुरवठा करणाऱ्या भारतावर का आली लस आयात करण्याची वेळ? वाचा कारण ) मास्क वापरणं अत्यंत महत्त्वाचं कोरोना विषाणूची दुसरी लाट 100 दिवसांपर्यंत टिकू शकते. शिवाय जोपर्यंत 70 टक्के लोकांच लसीकरण होतं नाही आणि हर्ड इम्युनिटी वाढत नाही, तोपर्यंत अशा लाटा येतच राहतील. त्यामुळे मास्क वापरणे हा एकच पर्याय तूर्तास उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या