एबीपी न्यूज -सी व्होटर च्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला फक्त 29 जागा मिळतील, असा अंदाज आहे. अखिलेश आणि मायावती यांच्या आघाडीला 47 जागा मिळतील, असं या सर्व्हेमध्ये म्हटलंय.
लखनऊ, 21 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमिवर आता उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार सपा 37 आणि बसपा 38 जागांवर निवडणुका लढणार आहे. तर, पाच जागा या मित्रपक्षांसाठी ठेवणार आहेत. दरम्यान, लोकसभेसाठी सपा आणि बसपानं एकत्र लढण्याची घोषणा केल्यानंतर अमेठी आणि रायबरेली येथे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भाजपविरोधात दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. **VIDEO : उद्धव ठाकरेंनंतर युतीवर काय म्हणाले आदित्य?**मुलायम सिंह यांची नाराजी दरम्यान, सपा - बसपाच्या आघाडीवर मुलायम सिंह यांनी नाराजी व्यक्त करत आपल्याच पक्षाचे लोक पक्षाला संपवत असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, तिकीट देण्यास उशिर झाला असून पक्षातील माझं काम काय तेच कळत नसल्याची खंत देखील मुलायम सिंह यांनी व्यक्त केली आहे. तसेच भाजप खूपच पुढे असल्याचं देखील मुलायम सिंह यादव यांनी म्हटलं आहे. भाजपसमोर दुहेरी आव्हान 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं उत्तर प्रदेशमध्ये 70 जागा जिंकल्या होत्या. पण, यावेळी मात्र भाजपा काँग्रेस आणि सपा - बसपाचं सरळ आव्हान असणार आहे. शिवाय, 2014 प्रमाणे 70 जागा जिंकता येतील का?ही देखील भाजपला शंका आहे. त्यामुळे भाजपनं आता उर्वरित राज्यांमध्ये देखील आपलं लक्ष अधिकपणे केंद्रीत केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये होणारं नुकसान भाजप महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधून भरून काढण्यावर भर देईल. निवडणुकीची घोषणा लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, रणनीती आखण्यावर सध्या भर दिला जात आहे.पण, प्रतिक्षा आहे ती निवडणूक आयोगाच्या घोषणेची. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. शिवाय, लोकसभेच्या निवडणुका या 10 टप्प्यांमध्ये होऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी ‘न्यूज18 लोकमत’ला दिली आहे.