JOIN US
मराठी बातम्या / देश / SEBI च्या 3 ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर CBI ची छापेमारी, बंगालमधील मोठ्या घोटाळ्याची पाळमुळं मुंबईत

SEBI च्या 3 ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर CBI ची छापेमारी, बंगालमधील मोठ्या घोटाळ्याची पाळमुळं मुंबईत

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) सोमवारी शारदा पोंझी घोटाळ्याप्रकरणी सुरू (Saradha Ponzi scam) असलेल्या चौकशीच्या संदर्भात मुंबईतील अनेक ठिकाणी छापे टाकत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विवेक गुप्ता, मुंबई, 22 मार्च: मुंबईतील विविध भागात देशातील एका मोठ्या घोटाळ्यासंदर्भात सीबीआयची छापेमारी सुरू आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) सोमवारी शारदा पोंझी घोटाळ्याप्रकरणी सुरू (Saradha Ponzi scam) असलेल्या चौकशीच्या संदर्भात मुंबईतील अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. मुंबईतील एकूण 6 भागात ही छापेमारी सुरू आहे. SEBI च्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या घरामध्ये ही छापेमारी सुरू आहे. सेबीच्या तीन अधिकाऱ्यांच्या घरावर ही धाड करण्यात आली आहे. शारदा स्कॅमबाबत ही छापेमारी सुरू आहे. यावेळी हे तीनही अधिकारी कोलकातामध्ये पोस्टेड होते.

संबंधित बातम्या

अशी माहिती मिळते आहे की, 2009 ते 2013 दरम्यानच्या कोलकाता कार्यालयातील पोस्टिंग दरम्यान झालेल्या कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपांमुळे सेबीचे हे तीन अधिकारी चौकशीच्या कक्षेत आले आहेत. शारदा स्कॅम किंवा शारदा ग्रुप फायनान्शिअल स्कँडल हा 2013 मधील एक सर्वात मोठा घोटाळा होता. तेव्हापासून या कोट्यवधींच्या पोंझी स्कीमची चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या