सारा तेंडुलकरने नुकताच एका लग्नातला तिचा लूक शेअर केला आहे. त्यातील एका फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणाली की, तिला राजकुमारी असल्यासारखं वाटत होतं. तिच्या सुंदर फोटोंवर युवराज सिंगची पत्नी हेजल कीचनेही कमेंट केली आहे.
सारा तेंडुलकर सध्या लग्नाचा सीझन मस्त एन्जॉय करत आहे. लग्नाच्या सीझनमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच ती दिल्लीत एका मित्राच्या लग्नाला गेली होती. (All Photo Credit: Sara tendulkar Instagram)
मित्राच्या लग्नातील तिचा लूक खूप चर्चेत आला होता. आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या सारा या लग्नातही आकर्षणाच्या केंद्रस्थानी होती.
साराने इंस्टाग्रामवर लग्नाच्या सीझनमधील तिच्या लूकचा एक फोटो शेअर केला आणि तिला राजकुमारी असल्यासारखं वाटत असल्याचं तिनं सांगितलं.
तिच्या या फोटोंवर कमेंट करताना युवराज सिंगची पत्नी हेजल कीचनंही म्हटलं की, तू खरंच राजकुमारी दिसतेस.