JOIN US
मराठी बातम्या / देश / वाढदिवसाच्या पार्टीत आलेल्या मेहुणीचा दाजीच्या भावावर जीव जडला, सातच दिवसाच्या ओळखीत असं झालं की...

वाढदिवसाच्या पार्टीत आलेल्या मेहुणीचा दाजीच्या भावावर जीव जडला, सातच दिवसाच्या ओळखीत असं झालं की...

असं म्हणतात की, प्रेमात (love) की नकारही असतो आणि होकार असतो. अशीच एक प्रेमी युगुलाची होकाराची घटना समोर आली आहे. बिहारमधील या प्रेमी युगुलाचे (couple) फक्त सात दिवसांच्या ओळखीत एकमेकांवर प्रेम जुळले. इतकेच नव्हे तर यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा (बिहार), 13 एप्रिल :  असं म्हणतात की, प्रेमात (love) की नकारही असतो आणि होकार असतो. अशीच एक प्रेमी युगुलाची होकाराची घटना समोर आली आहे. बिहारमधील या प्रेमी युगुलाचे (couple) फक्त सात दिवसांच्या ओळखीत एकमेकांवर प्रेम जुळले. इतकेच नव्हे तर यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तसेच एकमेकांसोबत सात जन्म सोबत राहण्याची शपथही घेतली. विशेष म्हणजे हे लग्न खरमास मध्ये केले गेले आहे. खरमास म्हणजे या महिन्यात बिहारमध्येय हिंदू धर्मातील लोक लग्न करत नाहीत. काय आहे संपूर्ण प्रकार? प्रेम युगुलाची ही कहाणी पाटणाच्या जवळच्या नौबतपूर परिसरातील आहे. या लग्नात वधू ही युवकाची मेहुणी झाली तर त्याचा भाऊच त्या वधूचा पती. दोघांना फक्त सात दिवसातच त्यांना त्यांचा सात जन्माचा साथीदार मिळाला. यानंतर गावातील प्रमुख आणि सरपंच यांनी पुढाकार घेऊन गावातीलच शिव मंदिरात दोघांचे लग्न लावून दिले आणि दोघांना सात जन्माचा जोडीदार बनवले. असे सांगण्यात आले आहे की, करणपुरा गावातील रहिवासी मनीष कुमारच्या घरी त्याच्या भावाची मेहुणी वाढदिवसाच्या पार्टीत सात दिवस आधी दानापूरच्या नासरीगंज येथून आली होती. याचदरम्यान, या दोघांमध्ये संवाद सुरू झाला. आणि हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. इतकेच नव्हे तर दोघांनी एक दुसऱ्यासाठी जगण्या-मरण्याच्या शपथा घेतल्या. यानंतर परिवारातील लोकांनी आणि स्थानिकांनी या दोघांचे प्रेम पाहिले. तसेच रात्रीच्या अंधारात दोघांना एक दुसऱ्याला भेटतानाही पकडले. हेही वाचा -  भारतात 10 पैकी 7 महिला नोकरी सोडत आहेत किंवा सोडण्याच्या विचारात; काय आहे कारण? यानंतर नातेवाईकातील प्रमुख आणि सरपंच यांना बोलविण्यात आले आणि मंगळवारी सकाळी कोणत्याही मुहूर्ताविना, वरात सजविण्यात आली. मंदिरातच हिंदू रितीरिवाजांनुसार पंडितांना बोलावून मंगल गीते लावून लग्न करण्यात आले. या लग्नासाठी दोन्ही बाजूचे लोक जमले होते. 7 दिवसांचे प्रेम हे 7 जन्माचे प्रेम ठरल्याने परिसरात चर्चेचा विषय राहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या