JOIN US
मराठी बातम्या / देश / 'आम्ही अहिंसेची भाषा बोलू, मात्र हातात काठी ठेवू कारण..' मोहन भागवत पुन्हा गरजले

'आम्ही अहिंसेची भाषा बोलू, मात्र हातात काठी ठेवू कारण..' मोहन भागवत पुन्हा गरजले

स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद यांच्या स्वप्नांचा भारत साकार होण्याच्या जवळ आहे आणि त्यासाठी संपूर्ण समाजाला एकत्र काम करावे लागेल, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी केले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरिद्वार 15 एप्रिल  : स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद यांच्या स्वप्नांचा भारत साकार होण्याच्या जवळ आहे आणि त्यासाठी संपूर्ण समाजाला एकत्र काम करावे लागेल, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी केले आहे. हरिद्वार (Haridwat) येथे ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी यांची मूर्ती, प्राण प्रतिष्ठा आणि गुरुत्रय मंदिराचे उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. धर्माच्या रक्षणासाठी चौकीदारी करण्याची भूमिका - आम्ही अहिंसाची भाषा बोलू, मात्र, हातात काठी ठेवू. आमचे कोणाशीही वैर नाही. मात्र, जग हे सत्तेची, बळाची भाषा ऐकते. म्हणून दिसायली हवी अशी आपल्याजवळ असायला हवी, असेही सरसंघचालक भागवत यावेळी म्हणाले. हरिद्वारमध्ये बुधवारी साधु संतांना संबोधित करताना देव आणि माणूस या दोघांमध्ये साधू सतांनी एक सेतू स्वरुपात केल्याने त्यांनी साधु संताची स्तुती केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक बी. हेडगेवार यांनी स्वयंसेवकांना धर्माच्या रक्षणासाठी चौकीदारी करण्याची भूमिका सोपवली आहे.  हेही वाचा -  PM Museum : पंतप्रधान संग्रहालय पाहून व्हाल अचंबित! फोटोच्या माध्यमातून पहा झलक सनातन धर्मच हिंदू राष्ट्र - स्वामी विवेकानंद, महर्षि अरविंद यांच्या स्वप्नांचा भारत साकार होण्याच्या जवळ आहे. लोक म्हणतात, याच गतीने चाललात तर यात 20-25 वर्ष लागतील. मात्र, मला माझ्या अनुभवावरुन वाटते की, हेच कार्य 8-10 वर्षांत साकार होईल. यासाठी संपूर्ण समाजाला सोबत येऊन, एक येऊन काम करावे लागेल, असेही ते म्हणाले.

सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे. सनातन धर्म आणि भारत हे शब्द समान आहेत. आपले राष्ट्रीयत्व दिवसेंदिवस गंगेच्या प्रवाहाप्रमाणे वाहत आहे. जोपर्यंत राष्ट्र आहे, तोपर्यंत धर्म आहे. धर्माच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले तरच भारताचा उदय होईल. एक हजार वर्ष भारतातील सनातन धर्म संपवण्याचे प्रयत्न झाले, पण ते लोक नाहीसे झाले. मात्र, आपण आणि सनातन धर्म आजही तिथेच आहे, असेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या