JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनापाठोपाठ महागाईच्या लाटेने मध्यमवर्गाचं कंबरडं मोडलं; 6 महिन्यांतला उच्चांक

कोरोनापाठोपाठ महागाईच्या लाटेने मध्यमवर्गाचं कंबरडं मोडलं; 6 महिन्यांतला उच्चांक

कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे अगोदरच सामान्यांचं कंबरडं मोडलं असताना त्यात महागाईची भर पडल्याचं नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीतून दिसून आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जुलै : कोरोना विषाणू (Corona Virus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) अगोदरच सामान्यांचं कंबरडं मोडलं असताना त्यात महागाईची (Inflation) भर पडल्याचं नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीतून दिसून आलं आहे. जून महिन्यात किरकोळ महागाई दर 6.26 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यातील हा सर्वोच्च आकडा (Highest figure) असून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याचं यातून दिसून येत आहे. महागाई नियंत्रणाबाहेर साधारणपणे महागाई दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्तीत जास्त 2 टक्के फरक पडणं, हे सामान्य मानलं जातं. सर्व मिळून 4 टक्क्यांपेक्षा अधिक फरक पडू देणार नाही, असं ध्येय सरकारनं निश्चित केलं होतं. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून आपलं लक्ष्य पुर्ण करण्यात सरकारला यश आलेलं नाही. म्हणजेच महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे. मे महिन्यात महागाईचा दर 5.15 टक्के नोंदवला गेला होता. तर जून महिन्यात हा दर 6.26 टक्के नोंदवला गेला आहे. सलग दोन महिन्यांपासून सामान्यांना महागाईच्या झळा बसत असल्याचं या आकडेवारीतून सिद्ध झालं आहे. यामुळे महागाईत वाढ किरकोळ महागाई दर हा जीवनावश्यक गोष्टींशी निगडित असतो. त्यात खाद्यतेल, धान्य आणि इंधन यांचा प्रामुख्याने समाइवेश असतो. गेल्या सहा महिन्यांपासून यातील सर्व घटकांच्या दरात वाढ होत असल्यामुळे महागाईचा दर वाढणे साहजिक होते, असं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस आणि खाद्यतेल या चारही घटकांच्या किंमती गेल्या सहा महिन्यात सुमारे 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. हे वाचा - महिलेनं दिला एकदम 4 बाळांना जन्म, सोशल मीडियावर लोकसंख्या विधेयकाची चर्चा इंधन आणि वीजेची महागाई 12.7 टक्क्यांवर इंधन आणि वीज यांच्या महागाईत सर्वाधिक वाढ झाल्याचं सिद्ध झालं आहे. या दोन्हींचा एकत्रित महागाई दर 12.7 टक्के नोंदवला गेला आहे. मे महिन्यात हा दर   11.6 टक्के नोंदवण्यात आला होता. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे व्यवसाय बुडाले, अनेकजण देशोधडीला लागले. त्यात आता महागाई वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या