प्रातिनिधिक फोटो
मुंबई, 22 जुलै : आधार कार्ड, पॅन कार्डप्रमाणेच रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका (Ration Card) हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. रहिवासी पुरावा, तसंच अन्नधान्याशी संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डचा वापर होतो. रेशन कार्डच्या माध्यमातून देशातल्या गरीब, गरजू नागरिकांना दरमहा अन्नधान्य (Food Grains) वितरित केलं जातं. गेल्या काही वर्षांत सरकारने अन्नधान्य वितरण प्रणालीत (Distribution System) अनेक सकारात्मक बदल केले आहेत. देशातले बहुसंख्य नागरिक अपात्र असतानाही रेशन कार्डशी संबंधित योजनांचा लाभ घेत असल्याचं निर्दशनास आलं आहे. आर्थिक स्थिती चांगली असतानाही काही नागरिक फसव्या मार्गाने रेशनशी निगडित योजनेचा लाभ घेतात. अशा बनावट गरिबांना लगाम घालण्यासाठी सरकार (Government) सरसावलं आहे. आता रेशन कार्डशी संबंधित मानकांमध्ये (Standards) बदल केले जाणार असून, लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. मानकांमध्ये बदल केल्यानंतर फसव्या मार्गाने रेशनच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांबाबत स्पष्टता येणार असून, त्यांच्या मुसक्या आवळता येणार आहेत. `आज तक`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. पेन्शन, बंगला आणि बरंच काही… निवृत्तीनंतर रामनाथ कोविंद यांना मिळणार या सुविधा काय आहेत बदल? देशभरातल्या गरीब, गरजू नागरिकांना पुरेसं अन्नधान्य मिळावं, यासाठी मोफत रेशनसारख्या (Free Ration) अनेक योजना राबवल्या जातात; मात्र या योजनांचा लाभ आर्थिक स्थिती चांगली असलेले नागरिक फसव्या मार्गानं घेत आहेत. ही बाब लक्षात येताच अशांना लाभार्थी यादीतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसंच रेशन कार्डशी निगडित मानकांमध्ये लवकरच मोठा बदल केला जाणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या (Department of Food and Public Distribution) म्हणण्यानुसार, सध्या देशभरातले सुमारे 80 कोटी गरजू नागरिक राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याचा (National Food Security Law) लाभ घेत आहेत. त्यामध्ये अनेक बनावट गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले नागरिकही आहेत. आता अशा नागरिकांना योजनेतून वगळण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने रेशन कार्डाच्या मानकांमध्ये बदल करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या संदर्भात विविध राज्यांच्या सरकारांसोबत बैठका सुरू आहेत. Sologamy : स्वत:शीच लग्न केलेली क्षमा बिंदू एकटीच निघाली हनीमूनला, कारणही आहे तयार शासकीय शिधावाटप दुकानांमधून रेशन कार्डाच्या माध्यमातून अन्नधान्य घेणाऱ्या पात्र नागरिकांसाठी ठरवून दिलेल्या मानकांमध्ये सरकार बदल करणार आहे. लवकरच पात्रतेच्या नवीन मानकांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. रेशन कार्डधारकांसाठी नवीन मानकं स्पष्ट झाल्यावर शासकीय मोफत रेशन योजनांचा लाभ घेणाऱ्या बनावट गरिबांची नावं यादीतून वगळण्यात येतील आणि केवळ पात्र नागरिकांनाच या योजनांचा लाभ घेता येईल. तसंच फसव्या मार्गाने या योजनांचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील.