JOIN US
मराठी बातम्या / देश / जो लौट के घर ना आए.. बहिणीचा शेवटचा फोन, मुलीचा व्हिडिओ कॉल... राजौरीतील 4 शहीद जवानांची कहाणी

जो लौट के घर ना आए.. बहिणीचा शेवटचा फोन, मुलीचा व्हिडिओ कॉल... राजौरीतील 4 शहीद जवानांची कहाणी

Rajouri Terror Attack: 21 वर्षीय रायफलमन निशांत मलिकने बुधवारी व्हिडिओ कॉलवर हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी शहरात आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्याच्या बहिणीने गुरुवारी सकाळी फोन केला. मात्र, काहीच उत्तर आलं नाही.

जाहिरात

राजौरीतील 4 शहीद जवानांची कहाणी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : देशातील तीन वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये राहणाऱ्या चार कुटुंबांचे जीवन गुरुवारी अचानक ठप्प झाले. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद झाल्याने त्यांच्यावर डोंगर कोसळला. या कुटुंबातील सदस्यांसाठी जगण्याचा उद्देशच हरवून गेला होता. त्यांच्या हौतात्म्याच्या काही तास आधी, 48 वर्षीय सुभेदार राजेंद्र प्रसाद भांबू यांनी त्यांच्या मुलीसोबत व्हिडिओ कॉलवरुन संपर्क केला होता. पण, खराब सेलफोन नेटवर्कमुळे कॉल डिस्कनेक्ट झाला होता. भांबूचा धाकटा भाऊ राजेश हा सरकारी शाळेत शिक्षक आहे. राजेश सांगतात की, पहाटे पाचच्या सुमारास आम्हाला तो जखमी झाल्याची माहिती मिळाली. नंतर आम्हाला सांगण्यात आले की तो शहीद झाला आहे. भांबू 2023 मध्ये निवृत्त होणार होते. निवृत्तीनंतर पुढील वर्षी मार्चमध्ये त्यांच्या मुलीचे लग्न होणार होते. भांबू यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, 21 वर्षीय रायफलमन निशांत मलिक हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी शहरात बुधवारी आपल्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलवर बोलत होता. रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच्या बहिणीने गुरुवारी सकाळी फोन केला होता. पण, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हांसीमध्ये तैनात असलेले उपविभागीय अधिकारी (सार्वजनिक आरोग्य) आणि निशांतचे कौटुंबिक मित्र रणबीर मलिक यांनी सांगितले की, संध्याकाळी निशांतच्या शहीद झाल्याची माहिती त्याच्या वडिलांना मिळाली. काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ला तर दिल्लीत घातपात, 15 ऑगस्टआधी 5 मोठ्या घडामोडी रायफलमॅन डी लक्ष्मण जुळे भाऊ होते तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील टी पुडुपट्टी गावातील रायफलमॅन डी लक्ष्मणचा जुळा भाऊ रामू म्हणाले की, दोघांनाही सैन्यात भरती व्हायचे होते आणि भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. पण, लक्ष्मण एकटाच भरती झाला. आम्हाला त्यांचा अभिमान आहे नोव्हेंबरमध्ये लग्न हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यातील शाहजहांपूर गावातील रायफलमन मनोज कुमार दोन वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाले होते. फरिदाबाद पोलिसांचे प्रवक्ते सुबे सिंग यांनी सांगितले की, कुटुंबातील चार भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या कुमारचे नोव्हेंबर 2021 मध्ये लग्न झाले होते. सिंह म्हणाले की, गुरुवारी सकाळी कुमार यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या हौतात्म्याची माहिती देण्यात आली. राजौरी येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात लष्कराने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या