JOIN US
मराठी बातम्या / देश / योगींच्या विधेयकाला काँग्रेसच्या मंत्र्यांच्या पाठिंबा, लोकसंख्या नियंत्रणावर म्हणाले...

योगींच्या विधेयकाला काँग्रेसच्या मंत्र्यांच्या पाठिंबा, लोकसंख्या नियंत्रणावर म्हणाले...

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी नवे लोकसंख्या धोरण (New Population Policy) सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. योगींच्या या विधेयकाला एक अनपेक्षित पाठिंबा मिळाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 14 जुलै: देशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी नवे लोकसंख्या धोरण (New Population Policy) सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. योगींच्या या विधेयकाला एक अनपेक्षित पाठिंबा मिळाला आहे. योगींना हा पाठिंबा काँग्रेस शासित राज्याच्या मंत्र्यांनी दिला आहे. आता ‘हम दो, हमारे एक’ ही घोषणा देण्याची वेळ आली आहे, असं त्यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानमधील अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरकारमधील आरोग्य मंत्री डॉ. रघू शर्मा  (Dr.Raghu Sharma) यांनी या विधेयकाला पाठिंबा देणारं सूचक वक्तव्य केलं आहे. नव्या लोकसंख्या धोरणाबाबत बोलताना शर्मा म्हणाले की, ‘वाढती लोकसंख्या हा देशाच्या चिंतेचा विषय आहे. आता ही लोकसंख्या नियंत्रित करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आगामी पिढी चांगल्या पद्धतीनं आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयी घेऊ शकेल. 30-40 वर्षांपूर्वी ‘हम दो, हमारे दो’ अशी घोषणा होती. आता ‘हम दो, हमारा एक’ ही घोषणा देण्याची वेळ आली आहे,’ असंही शर्मांनी यावेळी सांगितलं. शर्मा यांच्या वक्तव्यामुळे राजस्थान सरकार देखील या प्रकारचा कायदा आणण्याच्या विचारात आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या

‘भाजपामुळे ही वेळ आली’ यापूर्वी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघल यांनी भाजपाला त्यांच्या जुन्या धोरणाची आठवण करुन दिली होती. ‘यापूर्वी झालेल्या नसबंदीच्या अभियानाला याच मंडळींनी विरोध केला होता. त्यांनी 1970 च्या दशकात नसबंदी अभियानाला पाठिंबा दिला असता तर ही वेळ आली नसती. त्यावेळी तो त्यांचा निवडणुकीतील मुख्य मुद्दा होता. मोठी बातमी : प्रशांत किशोर यांचे नव्या इनिंगचे संकेत; काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता या विषयावर कायदा बनवला तरी काही फायदा होणार नाही. लोकांमध्ये जागरूकता आवश्यक आहे. हा निवडणुकीचा मुद्दा करू नये. ‘हम दो, हमारे दो’ ही घोषणा यापूर्वी देखील होती. लोकसंख्येची वाढ रोखण्यासाठी जागृती आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या