JOIN US
मराठी बातम्या / देश / राहुल गांधींनी आपल्या आजीला भेटायला जाण्यात गैर काय? काँग्रेसनं दिलं भाजपच्या टीकेला उत्तर

राहुल गांधींनी आपल्या आजीला भेटायला जाण्यात गैर काय? काँग्रेसनं दिलं भाजपच्या टीकेला उत्तर

राहुल गांधी हे रविवारी सकाळी कतार एअर वेजच्या विमानाने इटलीतल्या मिलानला गेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ते नेमके कधी परत येणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

जाहिरात

New Delhi: Congress leader Rahul Gandhi during party's 135th foundation day at AICC HQ in New Delhi, Saturday, Dec. 28, 2019. (PTI Photo/Kamal Kishore)(PTI12_28_2019_000020B)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 28 डिसेंबर: काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विदेश दौऱ्यावरून भाजपने (BJP) टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधी हे सध्या इटलीतल्या मिलानमध्ये आपल्या आजीची भेट घेण्यासाठी गेले आहेत. या आधीही राहुल यांच्या विदेश दौऱ्यावरून सोशल मीडियावरही जोरदार टीका करण्यात आली होती. आता या टीकेला काँग्रेसने उत्तर दिलं आहे. राहुल हे आपल्या आजीला भेटायला गेले यात गैर काय आहे असा सवाल काँग्रेसने केला आहे. भाजप अतिशय खालच्या स्तराचं राजकारण करत असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी केली आहे. काँग्रेस सोमवारी आपला 136वा वर्धापन दिन साजरा करत आहे. याच कार्यक्रमाला राहुल गांधी नसल्याने चर्चेत भरच पडली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, राहुल गांधी हे विदेश दौऱ्यावर आहेत. लवकरच ते परतणार आहेत. प्रत्येकाला वयक्तित दौऱ्यावर जाण्याचा अधिकार आहे.

स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केरत कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. देश हितासाठी आवाज उठवण्यास काँग्रेस कायम अग्रेसर राहिली आहे. सत्य आणि समानतेसाठी आमचा आवाज कायम बुलंद असेल याची आम्ही ग्वाही देतो असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी हे रविवारी सकाळी कतार एअर वेजच्या विमानाने इटलीतल्या मिलानला गेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ते नेमके कधी परत येणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र 31 डिसेंबरनंतरच ते येणार आहेत असंही बोललं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या