नवी दिल्ली 05 ऑक्टोबर: भारत (India) आणि चीन (China)च्या सीमेवर अजुनही तणाव आहे. चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचं स्पष्ट आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘राफेल’ या अत्याधुनिक विमानांचा समावेश झाल्याने भारताची स्थिती मजबूत झाली आहे. याचा धसका पाकिस्तान आणि चीनने घेतल्याचं सुरक्षा तज्ज्ञांचं मत आहे. या तणावात अमेरिकाही भारताच्या बाजूने असून आणीबाणीच्या प्रसंगात भारताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यताही संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर हवाईदल प्रमुख एस. के. भदौरीया (Air Force chief RKS Bhadauria) यांनी मोठं वक्तव्य दिलं आहे. भारत दोन्ही आघाड्यांवर युद्धासाठी तयार असल्याचं त्यांनी सोमवारी सांगितलं. भारत कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असून शत्रूवर आम्ही विजय मिळवू असंही ते म्हणाले. भारत आणि चीन सीमेवर तणाव असल्याने त्याचा फायदा घेत पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढविण्याची शक्यता आहे. तसा प्रयत्नही पाकिस्तान करत आहे. त्यातच चीनही पाकिस्तानतचा वापर करून घेण्याची शक्यता आहे. ती शक्यता लक्षात घेऊन भारत पूर्ण तयारीत असल्याचंही भदौरीया यांनी म्हटलं आहे. युद्धाची वेळ आलीच तर चीनला धडा शिकवणार , लष्कराचा Action Plan तयार! भारत आणि चीन यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत मात्र त्यातून काहीही तोडगा निघत नाही. चीन आडमुठी भूमिका घेत असून सतत कुरापती काढण्याचं काम सुरू आहे. चीनच्या विश्वासघातकीपणाचा अनुभव असल्याने भारतीय लष्कराने आता सर्व तयारी सुरू केली आहे. युद्धाचा प्रसंग आलाच तर लष्कर आणि हवाई दल एकाच वेळी आघाडी सांभाळणार असून कशा प्रकारे सामना करायचा याचा Action Plan तयार झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे. भारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL दहा महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे नवे पद तयार केलं होतं. माजी लष्कर प्रमुख बिपीन रावत यांची CDS म्हणून नियुक्तीही केली आहे. रावत तसेच लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणी हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरीया यांच्या बैठकाही होत आहेत. नरवणे आणि भदौरीया या दोघांचेही शिक्षण पुण्यातल्या एनडीएमध्ये झालं असून ते उत्तम मित्रही आहेत. त्यामुळे त्यांच्यात उत्तम समन्वय असल्याचं बोललं जातंय.