नवी दिल्ली, 7 मार्च : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा (Assembly election) निवडणुका पार पडल्या. कोरोनाच्या संकटादरम्यान पार पडलेल्या या निवडणुका अनेकार्थाने खास होत्या. दरम्यान आज निवडणुकांचे Exit Polls समोर आले (exit polls 2022) आहेत. यापैकी उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी राजकीय उलथापालथ झाली असल्याने नेमका अदमास बांधणं कठीण झालं होतं. अखेर याचे पोल्स समोर आले आहेत. इंडिया टूडेच्या पोल्सनुसार, काँग्रेसला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी मतदान कमी झालं असून यंदा 19 टक्के मतदान झालं आहे. तर भाजपला 7 टक्के मतदान झालं आहे. अकाली दलाला 19 टक्के मतदान झालं आहे. तर आम आदमी पक्षाला तब्बल 41 टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर अन्यला 5 टक्के मतदान झालं आहे. त्यांची पोल्स साइज 28,582 इतकी असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या पोल्सनुसार, आम आदमी पक्षाला सर्वाधिक मतदान झालं आहे. पंजाबध्ये 117 विधानसभेसाठी निवडणूक झाल्या असून विजयासाठी 59 जागा आवश्यक आहे. काँग्रेस - 19-31 (जागा येण्याची शक्यता) अकाली दल - 7-11 आप - 76-90 पंजाबमध्ये कोणाला मिळणार बहुमत? पंजाबमध्ये यंदा संघर्ष मोठी इंटरेस्टिंग आहे. यंदा येथे मल्टिअँगल फाइट पाहायला मिळत आहे. एकीकडे सत्तेत असलेली काँग्रेस आहे तर दुसरीकडे आम आदमी पार्टी, अकाली-बीएसपी आघाडी सरकार, भाजप आणि अमरिंदर सिंग यांचं अलाइन्स. त्याशिवाय शेतकरी संघटनेनेही यंदाच या पक्षांनी टक्कर दिली आहे. अशात पंजाबमध्ये कोणाचं सरकार येणार, याचा अंदाज बांधणं कठीण झालं होतं. पंजाबमध्ये किती झालं मतदान? पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी सर्व 117 विधानसभा जागांवर मतदान झालं. आता तरी सर्वांचं लक्ष 10 मार्च रोजी येणाऱ्या निकालांवर आहे. पंजाबमध्ये गेल्या वेळेस 77 टक्के मतदान झालं होतं. मात्र यंदा 72 टक्के मतदान झालं आहे. सर्वाधिक जास्त मतदान यंदा मालवा भागात झालं आहे. मालवा हा आम आदमी पक्षाचा गड मानला जात आहे. तलवंडी साबो विधानसभेत सर्वाधिक 83.67 टक्के मतदान झालं, तर अमृतसर पश्चिम जागांवर सर्वात कमी 50.10 टक्के मतदान झालं. मनसामध्ये 73.45%, मलेरकोटलामध्ये 72.84%, पतियाळात 62.10%, पूर्व अमृतसरमध्ये 59.77%, जलालाबादमध्ये 80.10%, लांबीत 72%, धुरीमध्ये 78.89%, भदौडमध्ये 70% मतदान झालं. 53 वर्षांनंतर पंजाबमध्ये असमंजस्य स्थिती यंदा पहिल्यांदाच पंजाबमध्ये दोन पक्ष वा आघाडी सरकारमध्ये सरळसोट लढत होण्याऐवजी ध्रुवीकरण झालं आहे. यात एकेकडे काँग्रेस, दुसरीकडे आम आदमी पार्टी, तिसरी बीएसपीची आघाडी, चौथी भाजप-अमरिंदर सिंह यांचं अलायन्स आणि पाचवी शेतकरी संघटनेचा मोर्चा आहे. यापूर्वी 1969 मध्ये अशीच स्थिती निर्माण झाली होती. ज्यात पंजाबची राजकीय स्थिती स्पष्ट दिसत नव्हती. एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या या लिंक वर क्लिक करून मिळेल.