JOIN US
मराठी बातम्या / देश / '25 वर्ष विचार केला नाही पण आता राजकारणात येणार,' रॉबर्ट वाड्रांची घोषणा

'25 वर्ष विचार केला नाही पण आता राजकारणात येणार,' रॉबर्ट वाड्रांची घोषणा

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यानंतर आता रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) देखील राजकारणात येणार आहेत. त्यांनी स्वत: ही घोषणा केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 26 फेब्रुवारी : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यानंतर आता रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) देखील राजकारणात येणार आहेत. त्यांनी स्वत: ही घोषणा केली आहे. रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे जावाई असून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आहेत. वाड्रा यांनी जयपूरच्या प्रसिद्ध मोती डूंगरी गणेश मंदिरात दर्शन घेतलं, त्यानंतर News 18 शी बोलताना त्यांनी राजकारणात  प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. काय म्हणाले वाड्रा? प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकाऱ्यांनी बेनामी संपत्ती प्रकरणी वाड्रा यांची यापूर्वी चौकशी केली होती. सरकारी एजन्सींचा चुकीचा वापर होत असून प्रत्येक वेळी आपल्याला लक्ष्य केलं जातं असा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. जयपूरमध्ये गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतरही त्यांनी या मुद्यावर मत व्यक्त केलं. ‘ED ला जितके प्रश्न विचारयाचे आहेत, त्यावर मी उत्तर देईल. मला आता  पुन्हा चौकशीला बोलवण्याचं काहीही कारण नाही. गेल्या 25 वर्षात आपण राजकारणातील प्रवेशाबाबत कधीही विचार केला नव्हता. मात्र राहुल गांधी आणि प्रियांका गांधी घराच्या बाहेर पडल्यानंतर आपला वापर केला जातो. मी आता राजकारणात येणार आहे.’ असं वाड्रा यांनी यावेळी स्पष्ट केलं. वाड्रा यांच्या या घोषणेनंतर सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यानंतर गांधी घराण्याशी थेट संबंध असलेली चौथी व्यक्ती आता लवकरच राजकारणात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘गोडसे भक्ताला दूर ठेवलं असतं’ मध्य प्रदेशमधील हिंदू महासभेचे माजी नेते आणि नथुराम गोडसे यांचा पुतळा बसवण्यात सक्रीय असलेल्या बाबूलाल चौरासिया (Babulal Chaurasia) यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर, ‘मला या विषयाची माहिती नाही, पण मी असतो तर गोडसेची पूजा करणाऱ्या व्यक्तीला मी राजकारणापासून दूर ठेवलं असतं,’ असं वाड्रा यांनी स्पष्ट केलं. (वाचा :  नरेंद्र मोदी हात जोडून ज्यांचा आशीर्वाद घेत आहेत त्या 106 वर्षांच्या आजीबाई कोण आहेत? ) देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही वाड्रा यांनी यावेळी मत व्यक्त केलं. ‘भारतामधील लोक सुशिक्षित आहेत. त्यांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही,’ असा दावा त्यांनी केला. उत्तर भारत-दक्षिण भारताच्या मुद्यावरील राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचा दावा वाड्रांनी केला आहे. गणेश मंदिरामध्ये देशवासियांच्या आरोग्याची प्रार्थना केली असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या