JOIN US
मराठी बातम्या / देश / आज पंतप्रधान मोदींची 'मन की बात', लसीकरणासंदर्भात मोठी माहिती देण्याची शक्यता

आज पंतप्रधान मोदींची 'मन की बात', लसीकरणासंदर्भात मोठी माहिती देण्याची शक्यता

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहे. सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित करतील.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहे. सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित करतील. हे त्यांचं 78 वं संबोधन असेल. आज मोदी मन की बात या कार्यक्रमातून देशातील वाढता कोरोनाचा आकडा आणि लसीकरणाचा वेग या स्थितीवर चर्चा करण्याची शक्यता आहे. तसंच लसीकरणात देशानं 40 कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आजची मोदींची मन की बात नक्कीच विशेष ठरणार आहे. या विक्रमी नोंदवर मोदी काय भाष्य करतात हे महत्त्वाचं असेल.

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात देश- विदेशातील लोकांसोबत आपले विचार शेअर करतील. मोदींचा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन समूह नेटवर्क किंवा आकाशवाणीच्या वेबसाईट सोबतच अॅपवरही प्रसारित होणार आहे. हेही वाचा-  Breaking News: जम्मू विमानतळावर स्फोट, जाणून घ्या अपडेट मन की बात कार्यक्रम आकाशवाणी, दूरदर्शन समाचार, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित होईल. येथे तुम्ही हा कार्यक्रम ऐकू आणि बघू शकता. तसंच रात्री आठ वाजता प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा ऐकू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या