नवी दिल्ली, 27 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Prime Minister Narendra Modi) आज मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी कोरोनाच्या लसीकरणाचे दोन्ही (Vaccinated) डोस घेणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. तसंच लस संबंधित अफवांपासून दूर राहा असंही त्यांनी म्हटलं आहे. लस संबंधित अफवांपासून दूर रहा. माझ्या आईने लसीचे दोन्ही डोस घेतले. तुम्हीही घाबरू नका, असंही त्यांनी सांगितलं. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिल्खा सिंग यांची देखील आठवण काढली आहे. पीएम मोदी म्हणाले की, कोरोनानं मिल्खा सिंग यांना आपल्याकडून हिरावलं. मी त्यांच्याशी बोललो होतो. तेव्हा ते मला म्हणाले होते की, मी ऑलिम्पिक खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी तयार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सोशल मीडियावर #cheer4India या हॅशटॅगचा वापर करुन तुम्ही खेळाडूंना शुभेच्छा देऊ शकता. आपणास इतर काही नावीन्य करायचे असेल तर तेही नक्की करा. जर तुम्हाला काही नवीन कल्पना असेल तर देशाने आपल्या खेळाडूंसाठी एकत्रितपणे हे केले पाहिजे, तर तुम्ही ते मला नक्की पाठवा. आपण सर्वजण एकत्रितपणे टोकियोला जाणाऱ्या आपल्या च्या खेळाडूंना सपोर्ट करूया.
पुढे मोदी म्हणतात, कोरोनाविरूद्ध आपल्या देशवासियांचा लढा चालू आहे, पण या लढाईत आम्ही एकत्रितपणे अनेक विलक्षण टप्पेही साध्य करत आहोत. काही दिवसांपूर्वी आपल्या देशाने अभूतपूर्व काम केले आहे. 21 जूनपासून लस मोहिमेचा पुढील टप्पा सुरू झाला आणि त्याच दिवशी देशात 86 लाखांहून अधिक लोकांना मोफत लस देण्याचा विक्रमही झाला आणि तेही एकाच दिवसात. हेही वाचा- जम्मू एअरबेसवर स्फोटाप्रकरणात दोन संशयित ताब्यात, बिल्डिंगचं छत कोसळलं आतापासून काही दिवसांनी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करूया. हा दिवस देशाचे महान चिकित्सक डॉ बी.सी. राय यांच्या जयंती निमित्त समर्पित आहे. कोरोना काळात डॉक्टरांनी केलेल्या योगदानाबद्दल आम्ही सर्व कृतज्ञ आहोत. देशातल्या डॉक्टरांनी त्यांच्या आयुष्याची पर्वा न करता जनतेची सेवा केली आहे. म्हणूनच यावेळी राष्ट्रीय डॉक्टर दिन अधिक विशेष असणार आहे.