JOIN US
मराठी बातम्या / देश / President Election : राष्ट्रपती निवडणुकीची मोठी बातमी, राजनाथ सिंह यांचा शरद पवारांना फोन!

President Election : राष्ट्रपती निवडणुकीची मोठी बातमी, राजनाथ सिंह यांचा शरद पवारांना फोन!

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

जाहिरात

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जून : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या (President Election 2022) पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट नकार दिला आहे. पण, या घडामोडीनंतर भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ शिंह (BJP leader Rajnath Singh) यांनी शरद पवार (sharad pawar) आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती (mayavati) यांना फोन केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West bengal CM Mamata Banerjee) यांनी देशातील विरोधकांची बैठक (Opposition Party meet) आयोजित केली होती. या बैठकीला 17 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीनंतर आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केली. राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांची बैठक संपल्यानंतर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बसपाच्या नेत्या मायावती यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच आज राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत मल्लिकार्जुन यांनी भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या नावावर चर्चा करु, असं राजनाथ यांना सांगितलं आहे. राजनाथ सिंह यांनी ममता आणि मल्लिकार्जुन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबतही फोनवर बातचित केली. राजनाथ सिंह यांनी बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तसेच एनडीएचे सहयोगी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवारांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला नकार दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाकडून उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या आठवड्यात सुरू होती. पण शरद पवार यांच्या राष्ट्रपतिपदासाठीच्या उमेदवारीबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं आहे. “राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांचा प्रस्ताव सर्वानुमते देण्यात आला होता. पण त्यांनी तो प्रस्ताव नाकारला”, असं ममता म्हणाल्या. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) देखील प्रचंड आग्रही होत्या. पण पवारांनी तो प्रस्ताव नाकारल्याने त्यांनी सोनिया गांधी यांच्या प्लॅनिंगला मोठा झटका दिल्याचं मानलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या