JOIN US
मराठी बातम्या / देश / मोठी बातमी: प्रशांत किशोर यांचे नव्या इनिंगचे संकेत; काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

मोठी बातमी: प्रशांत किशोर यांचे नव्या इनिंगचे संकेत; काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

प्रशांत किशोर हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून त्याबाबत मंगळवारी राहुल गांधींसोबत त्यांची चर्चा झाल्याचं काँग्रेसमधील सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 जुलै: निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) हे मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भेटीला गेल्यानंतर देशात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. प्रशांत किशोर हे काँग्रेस पक्षात प्रवेश (to enter congress) करणार असून त्याबाबत मंगळवारी राहुल गांधींसोबत त्यांची चर्चा झाल्याचं काँग्रेसमधील सूत्रांकडून सांगितलं जात आहे. निवडणूक रणनितीकार म्हणून आपली कारकीर्द थांबवून आता प्रशांत किशोर हे राजकीय करिअरचा विचार करत असल्याच्या चर्चांना त्यामुळं बळ मिळालं आहे. काय घडलं बैठकीत? काँग्रेस नेते राहुल गांधी आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल हेदेखील उपस्थित होते. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे या बैठकीवेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सवरून उपस्थित होत्या, अशी माहिती आहे.  किशोर यांच्या पक्षप्रवेशाबाबत गंभीर चर्चा करण्यासाठीच सोनिया गांधी स्वतः हजर असल्याचं सांगितलं जात आहे. इतर चर्चा या केवळ अफवा प्रशांत किशोर यांच्या भेटीत पंजाबमधील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली, असं सांगितलं जात होतं. त्याचप्रमाणं नवज्योतसिंग सिद्धू यांच्या ट्विटरनंतर ही भेट झाल्यामुळे पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी प्रशांत किशोर मध्यस्थी करत असल्याचीही चर्चा रंगली होती. त्यानंतर युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या नावाची चर्चा करण्यासाठी ही भेट होती, अशीदेखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांचं नाव निश्चित करण्याबाबत ही बैठक झाली, असा अंदाजदेखील माध्यमांमधून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या केवळ अफवा असून ही भेट प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशासंबंधीच होती, असं काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितलं आहे. हे वाचा - RSS च्या गुप्त बैठकीत ‘चादर आणि फादरमुक्त भारत’ करण्याची चर्चा प्रशांत किशोर यांची नवी इनिंग निवडणूक रणनितीकार म्हणून आपण आपलं काम थांबवत आहोत, असं प्रशांत किशोर यांनी जाहीर केलं होतं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी ‘NDTV’ला दिलेल्या मुलाखतीत याची अधिकृत घोषणा केली होती. आपल्या कामात बदल करणार असल्याचं त्यांनी सूचित केलं होतं. त्यानुसार आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चिन्हं आहेत. 2017 साली त्यांनी राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठी काम केलं होतं. मात्र तिथं काँग्रेसला काहीच कमाल आली नव्हती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी आणि प्रशांत किशोर एकत्र येत असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या