मुंबई, 18 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हीराबेन (Heeraben) यांचा आज (18 जून 22) 100वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी सकाळीच गुजरातमधील वडनगरात असलेल्या आपल्या घरी जात, आईचे पाय धुवून त्यांचा आशीर्वाद घेतला. तसंच, त्यांनी आपल्या आईला भेट (PM Modi gift to Mother) म्हणून एक शालदेखील दिली. या दिवसाचं औचित्य साधून, पंतप्रधानांनी आपल्या आईसाठी एक ब्लॉग (PM Modi Blog about Mother) देखील लिहिला आहे. या ब्लॉगचं शीर्षक त्यांनी ‘आई’ असं ठेवलं आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीव्यतिरिक्त अन्य प्रादेशिक भाषांमध्येदेखील हा ब्लॉग लिहिण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधानांनी आईचं महत्त्व, काही आठवणी आणि आपल्या आयुष्यातील काही किस्से (PM Modi life) सांगितले आहेत. . आईची महती सांगताना पंतप्रधान मोदी (PM Modi writes about Mother) लिहितात, ‘आई, हा केवळ एक शब्द नाही. तर जीवनातील ही अशी एक भावना आहे, ज्यामध्ये प्रेम, धैर्य, विश्वास अशा कित्येक गोष्टी समाविष्ट असतात. जगातील कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही देशात, प्रत्येक मुलाला सर्वांत प्रिय व्यक्ती आपली आईच असते. आई केवळ आपल्या शरीराच्या वाढीकडे नाही, तर आपलं मन, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास या गोष्टींच्या विकासाकडेही लक्ष देते. आपल्या मुलांकडे लक्ष देताना आई स्वतःलाही विसरून जाते.’ आईची गौरव गाथा पंतप्रधान मोदी पुढे लिहितात, ‘आमच्याकडे तसं तर वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नाही. मात्र, कुटुंबातील नव्या पिढीतील काही मुलांनी माझ्या वडिलांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या वर्षी 100 झाडे लावली होती. आज माझ्या जीवनात जे काही चांगलं आहे, माझ्या व्यक्तीमत्त्वात जे काही चांगले आहे; ती माझ्या आई आणि वडिलांची देणगी आहे. मी आज इथे दिल्लीमध्ये बसलो आहे, तर मला भूतकाळातील कित्येक गोष्टी आठवत आहेत. माझी आई (PM Modi Praises his Mother) जेवढी सामान्य आहे, तेवढीच ती असामान्यही आहे. अगदी प्रत्येक आई असते, तशीच. आज मी माझ्या आईबद्दल लिहितो आहे, तर वाचताना तुम्हाला वाटेल की अरे, माझी आई पण तर अशीच आहे. माझी आईसुद्धा असंच करायची. हा लेख वाचताना तुमच्या मनात तुमच्या आईची प्रतिमा उभी राहील. आईची तपस्या, तिच्या मुलांना एक चांगली व्यक्ती बनवते. आईची ममता तिच्या मुलांमध्ये मानवी भावना निर्माण करते. आई एखादी व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व नाही, तर ती एक स्वरूप आहे. आमच्याकडे एक म्हण आहे, जैसा भाव तैसा देव. त्याचप्रमाणे आपल्या मनातील भावानुसार, आपण आईचे स्वरूप अनुभवू शकतो.’ पंतप्रधानांच्या आईचं शंभरीत पदार्पण, मोदींनी पाय धुवत घेतला आशीर्वाद, पाहा PHOTOS मोदींची खंत या लेखात (PM Modi Blog) पंतप्रधान मोदींनी आपल्या आयुष्यातील काही किस्सेदेखील सांगितले आहेत. लेखाच्या शेवटी ते लिहितात, ‘मी आजही आईला जेव्हा भेटतो, तेव्हा ती म्हणते की “मला मरेपर्यंत कोणाकडून सेवा करून घ्यायची नाही. असंच काम करत करत या जगातून निघून जायची इच्छा आहे.” माझ्या आईच्या जीवन प्रवासात मला देशातील सर्व मातृशक्तीचे तप, त्याग आणि योगदानाचे दर्शन होते. माझी आई आणि तिच्यासारख्या कोट्यवधी महिलांचे सामर्थ्य मी जेव्हा पाहतो, तेव्हा मला विश्वास वाटतो की, भारतातील लेकींना अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. आईचं अस्तित्व नसणं किंवा तिला भेटता न येणं या स्थितीत आपल्याला तिची महती लक्षात येते. तिचं जवळ नसणंच ती किती महान आहे हे समजवून देतं.संघर्षाच्या प्रत्येक क्षणाच्या वरचढ एका आईची इच्छाशक्ती असते. आई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं जन्मशताब्दी (PM Modi Mother’s Birthday) वर्ष सुरू होत आहे. सार्वजनिकपणे मी याआधी कधीही तुमच्यासाठी एवढं लिहायचं, एवढं बोलायचं धाडस करू शकलो नाही याची खंत वाटते. तुम्ही निरोगी रहा, आम्हा सर्वांवर तुमचा आशीर्वाद कायम असूद्या, हीच देवाकडे प्रार्थना आहे.’ आई-वडिलांच्या आठवणी ‘माझी आई, हीराबा आज 18 जून रोजी आपल्या वयाच्या 100व्या वर्षात प्रवेश करत आहे. म्हणजेच त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. आज माझे वडील जिवंत असते, तर मागच्याच आठवड्यात तेदेखील 100 वर्षांचे झाले असते. म्हणजे 2022 असं वर्ष आहे, ज्यात माझ्या आईचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होते आहे, आणि याच वर्षी माझ्या वडिलांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण झाले आहे.’ अशा शब्दांमध्ये मोदींनी आपल्या वडिलांचेही स्मरण केले.