JOIN US
मराठी बातम्या / देश / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली कोरोना लस!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली कोरोना लस!

पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 01 मार्च : कोरोनावर मात करण्यासाठी भारतात लस देण्याची (corona vaccination) मोहिम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी लस घ्यावी अशी आग्रहाची मागणी विरोधकांकडून होत होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनाची लसीकरणाच्या मोहिमेचा तिसऱ्या टप्पा आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे. पंतप्रधानांनी COVAXIN लस घेतली आहे. एम्स हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या आणि पुद्देचरी येथील राहणाऱ्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची लस दिली आहे.

‘AIIMS हॉस्पिटलमध्ये COVID-19 लस घेतली आहे. आपले डॉक्टर आणि शास्त्रांनी कोरोनाच्या विरोधातील लढाईत कमी वेळेत महत्त्वाचे काम केले आहे. जी लोकं कोरोना लस घेण्यासाठी योग्य आहे, त्यांनी लस टोचून घ्यावी, आपल्या सर्वांना भारत कोरोनामुक्त करायचा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पंतप्रधान मोदींनी दिली. देशात लसीकरणाच्या (corona vaccination) तिसऱ्या टप्प्याल सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. सोबतच 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्या रुग्णालयांमध्ये जन आरोग्य योजना तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजना राबवल्या जातात तिथे हे लसीकरण देण्यात येणार आहे. तसंच शासनाच्या निर्धारित रुग्णालयात लसीकरण विनामूल्य आहे, तर खाजगी रुग्णालयात मात्र लसीकरणाच्या प्रत्येक डोससाठी 250 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे.  60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या ज्यांना इतर आजार आहेत, अशा व्यक्तींचा या लसीकरणात समावेश आहे. सरकारी आणि खासगी केंद्रांवर ही लस दिली जाईल. यासाठी 10,000 सरकारी आणि 20,000 खासगी केंद्रे आहेत. सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रावर शुल्क घेऊन लस दिली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या