JOIN US
मराठी बातम्या / देश / चिंता मिटणार; मोदींच्या 3 उपाययोजना करणार Oxygen तुटवडा दूर

चिंता मिटणार; मोदींच्या 3 उपाययोजना करणार Oxygen तुटवडा दूर

भारतात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनचा हा तुटवडा दूर करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 एप्रिल: भारतात कोरोनाचा (Corona) संसर्ग मोठ्या वेगाने पसरत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) जाणवत आहे. देशभरातील विविध राज्यांत निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक महत्वाची बैठक घेतली. ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी करण्यात येणाऱ्या मार्गांवर या बैठकीत चर्चा झाली. एएनआय न्यूज एजन्सीने पंतप्रधान कार्यालयाचा हवाला देत सांगितले की, या उच्चस्तरीय बैठकीत (High level meeting) अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या काही आठवड्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मोदींनी सांगितले तीन उपाय पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, या उच्चस्तरीय बैठकीत मोंदींनी ऑकिस्जनची उपलब्धता वाढवण्यासाठी तीन उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. पहिला उपाय म्हणजे ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात, दुसरा उपाय ऑक्सिजन वितरणाची गती वाढवण्याचा आणि तिसरा म्हणजे आरोग्य सुविधांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गांचा वेगवान पद्धतीने वापर करणे.

संबंधित बातम्या

वाचा:  लज्जास्पद राजकारण! सीताराम येचुरी यांच्या मुलाच्या निधनावर भाजप नेत्याची टिप्पणी या उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन आणि त्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारांसोबत समन्वय साधला जात आहे. सध्यस्थितीत भारतातील 20 राज्यांना दररोज 6,785 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता आहे, या मागणीनुसार 21 एप्रिलपासून या राज्यांना दररोज 6,822 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खासगी आणि सार्वजनिक पोलाद उद्योग तसेच ऑक्सिजन उत्पादकांच्या योगदानामुळे गेल्या काही दिवसांत दररोज 3,300 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती वाढली आहे. पीएसए ऑक्सिजन प्रकल्प लवकर राबवण्यासाठी राज्यांसोबत मिळून काम करत आहोत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि अखंडित करावा याची काळजी घ्यावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या