30 एप्रिल : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती ठीक नसल्याची बातमी ऐकताच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची तातडीने भेट घेतली आहे. लालूप्रसाद यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राहुल गांधी दिल्लीच्या एम्समध्ये पोहचले आहेत. किमान अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान, लालूंचे आरोग्य लवकर सुधारावे अशी प्रार्थना करत अनेक राजकीय मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी चर्चा केली. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला रविवारी काँग्रेसच्या आक्रोश रॅलीमध्ये लक्ष्य केलं होतं. त्यामुळे ही बैठक राजकीय असल्याची चर्चा सुरू आहे. त्याआधी आरएलएसपीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह, भाजपा नेते शत्रुघ्न सिन्हा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री अश्विनी चौबे यांनी एम्सला लालूंची भेट घेतली आहे.