JOIN US
मराठी बातम्या / देश / पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी संबोधणार, दोन्ही सभागृहात करणार भाषण

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी संबोधणार, दोन्ही सभागृहात करणार भाषण

Monsoon session 2021 Modi speech: आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)संसदेच्या पावसाळी (Monsoon Session) अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 जुलै: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Parliament Monsoon Session) सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संसदेच्या पावसाळी (Monsoon Session) अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी सभागृहात देशाच्या कोविड परिस्थितीवर भाष्य करतील. कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) ज्यांनी आपला जीव गमावला त्याबद्दल पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, बहुतेक खासदारांचं लसीकरण झालं आहे. यामुळे संसदेचं काम अधिक आत्मविश्वासाने पार पाडण्यास मदत होईल. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले की, पंतप्रधान मोदी 20 जुलै रोजी दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील आणि कोरोना महामारीबद्दल चर्चा करतील. ‘‘वारकऱ्यांनी तुडूंब भरलेलं पंढरपूर पाहायचंय’’, CMचं विठुराया चरणी साकडं पहिला दिवस गदारोळात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातला. त्यानंतर दोन्ही सभागृहातील कामकाज 20 जुलै 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. संसदेचं हे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सत्रादरम्यान सरकार (Central Government) अनेक विधेयकं पारीत करणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Second Wave of Coronavirus) जाणवलेला आरोग्य सुविधांचा अभाव आणि पेट्रोल तसंच डिझेलच्या वाढत्या किंमती (Hike in Petrol and Diesel Price) या मुद्द्यांवरुन विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला घेरण्याच्या तयारीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या