JOIN US
मराठी बातम्या / देश / देशातील Most Wanted गँगस्टर पपला गुर्जरला अटक; कोल्हापूरात आवळल्या मुसक्या

देशातील Most Wanted गँगस्टर पपला गुर्जरला अटक; कोल्हापूरात आवळल्या मुसक्या

पपलावर 5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. ऑपरेशनदरम्यान पपला पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. यासाठी त्याने इमारतीवरुन उडी घेतली होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपुर, 28 जानेवारी : मोस्ट वॉन्टेंड (Most Wanted) गँगस्टर पपला गुर्जल याला महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून जयपूर पोलिसांच्या टीमने अटक केली आहे. एक आठवड्यापूर्वी कोल्हापूरच्या टीमने यासंदर्भात तपास केला होता. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार पपला गुर्जर याला त्याच्या एक मैत्रिणीने राहायला जागा दिली होती. GRT च्या कमांडरांनी याचा छडा लावला व पपलाच्या मुसक्या आवळल्या. डीजीपी एम एल ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. 2017 पासून पपला उर्फ सहर हा फरार होता. त्याच्यावर राजस्थानमध्ये पपलाच्या विरोधात 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून हरियाणातही 4 गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे पपला उर्फ सहर हा एका मैत्रिणीच्या घरी लपून बसला होता. याबाबत माहिती मिळताच राजस्थान पोलीस कोल्हापूरला रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत 20 कमांडो असल्याची माहिती सांगितली जात आहे. हे ही वाचा- शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनी केला होता प्रयोग; किती वाढलं उत्पन्न? पपलावर 5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. ऑपरेशनदरम्यान पपला पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. यासाठी त्याने इमारतीवरुन उडी घेतली होती. मात्र तो टीमच्या हातातून सुटू शकला नाही व कमांडोंनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यासोबत त्याच्या मैत्रिणीलाही जयपूर येथे नेले जात आहे. पपला गुर्जर प्रकरणात आतापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आली आहे. उद्या बहरोड पोलीस ठाण्यात पपलाला हजर करण्यात येणार आहे. यावेळी सुरक्षेसाठी तब्बल 400 सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोर्ट आणि मार्गावर तैनात करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या