Pakistani Drone : भारत-पाकिस्तानदरम्यानची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून ड्रोन आलं होतं. यामध्ये हत्यारं आणि दारूगोळा होता. या ड्रोनवर लादलेल्या सामानाची तपासणी करण्यासाठी बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांना या ड्रोनवर सात मॅग्नेटिक बॉम्ब आणि सात ‘अंडर बॅरल ग्रेनेडल लाँचर्स’ (यूबीजीएल) सापडले. (सर्व फोटो ANI)
आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसल्यानंतर काही वेळातच रविवारी जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले.
या ड्रोनवर सात चुंबकीय बॉम्ब आणि तेवढेच UBGL ग्रेनेड होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
दक्षिण काश्मीर हिमालयातील पवित्र अमरनाथ गुहेची वार्षिक यात्रा सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. या भेटीपूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (जम्मू), मुकेश सिंह यांनी सांगितले की, पोलीस शोध पथकाला सकाळी राजबाग पोलीस स्टेशन हद्दीतील तल्ली हरिया चक परिसरात सीमेवर ड्रोनची हालचाल दिसली आणि त्यांनी त्यावर गोळीबार केला, त्यानंतर तो खाली पडला. .
सिंग म्हणाले की, या ड्रोनवर लादलेल्या सामानाची तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या बॉम्ब निकामी पथकाला सात चुंबकीय बॉम्ब आणि सात 'अंडर बॅरल ग्रेनेडल लाँचर्स' (यूबीजीएल) सापडले. सध्या सीमेपलीकडून वारंवार ड्रोनच्या हालचाली होत असल्याने पोलीस शोध पथके नियमितपणे या भागात पाठवली जात आहेत, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
30 जूनपासून या केंद्रशासित प्रदेशातील दोन मार्गांनी 43 दिवसांची अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. यापूर्वीही अशा यात्रा आणि यात्रेकरूंना दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आलं आहे.