JOIN US
मराठी बातम्या / देश / 62 वर्षीय व्यक्तीची डेल्टा प्लस व्हेरिएंटवर मात, सांगितले उपाय

62 वर्षीय व्यक्तीची डेल्टा प्लस व्हेरिएंटवर मात, सांगितले उपाय

Delta Plus Variant: डेल्टा प्लस या व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. 62 वर्षीय व्यक्तीला डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली होती.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भुवनेश्वर, 28 जून: देशात कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेनं (Second Wave) थैमान घातलं होतं. एकीकडे देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आरोग्य व्यवस्थेचा बराच बोजवारा उडालेला दिसला. आता दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या व्हेरिएंटनं **(Delta plus variant)**डोकं वर काढलं आहे. त्यातच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाटेचा (Third Wave) धोका असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. सर्वसामान्यांच्या मनात तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान ओडिशातील 62 वर्षीय व्यक्तीला डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली होती. त्यांनी आता कोरोनावर मात केली आहे. यानंतर या रुग्णानं डेल्टा प्लस व्हेरिएंटवर कशी मात केली हे सांगितलं आहे. देवगडच्या बारकोट ब्लॉकमध्ये राहणाऱ्या या रुग्ण एक महिन्याच्या आत कोरोनामुक्त झाला आहे. याचाच अनुभव त्यांनी सांगितलाय. कोरोनाची लागण झाल्यावर ते घरीच राहिले. ते सांगतात की, मी डॉक्टरांच्या सर्व सूचनाचं योग्य ते पालन केलं. त्यामुळे कोरोनावर मात करण्यास लवकर मदत झाली. हेही वाचा-  कोरोना लसीचा पहिला डोस किती प्रभावी?, वाचा मुंबई पालिकेचं सर्वेक्षण 23 एप्रिल रोजी मला अंगदुखी आणि फ्लूसारखी लक्षणे जाणवू लागली. यानंतर, 26 एप्रिल रोजी मला कोरोनाची चाचणी केल्यानंतर समजलं की, मला डेल्टा प्लस व्हेरिएंट संसर्ग झाला आहे. त्याआधी मी 30 मार्च रोजी कोविशिल्ट लसीचा पहिला डोस देखील घेतला होता, असं ते सांगतात. पुढे त्यांनी सांगितलं, मला कोरोनामुक्त होण्यास 20 ते 25 दिवस लागले. चांगली गोष्ट अशी आहे की, मला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली नाही. दुसरीकडे देवगडचे मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी (सीडीएमओ) एमके उपाध्याय यांनी सांगितलं की, या 62 वर्षीय कोरोना रुग्णाच्या गावात 10 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान एकूण 81 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यात 62 वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याच आढळून आलं. या व्हेरिएंटला केंद्र सरकारनं चिंतेची बाब असल्याचं दर्शवलं आहे. त्या व्यक्तीला डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झाल्याचे समजताच एपिडिमियोलॉजी टीम घटनास्थळी पोहोचली, असं सीडीएमओ यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या