डॉक्टरांच्या शपथवरुन वाद; NMCच्या मसुद्यात हिप्पोक्रॅटिक आणि चरक शपथही नाही, मग आहे तरी काय?
नवी दिल्ली, 7 जून : वैद्यकीय व्यावसायिक (Registered Medical Practitioners) अर्थात डॉक्टर्सना शिकण्यापूर्वी, प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी हिप्पोक्रॅटिक ओथ (Hippocratic Oath) घ्यावी लागते, त्याऐवजी चरक शपथ (Charak Shapath) घ्यावी, या मुद्द्यावरून बराच वाद झाला होता; मात्र या वादाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल मेडिकल कमिशन (National Medical Commission) अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने प्रसारित केलेल्या प्रोफेशनल कंडक्ट (Professional Conduct) अर्थात व्यावसायिक वर्तनाबद्दलच्या नव्या नियमांमध्ये हिप्पोक्रॅटिक ओथ किंवा चरक शपथ या दोन्हींचाही उल्लेख नाही. टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, NMCच्या रेग्युलेशनच्या नव्या मसुद्यामध्ये फिजिशियन्स प्लेज (Physician’s Pledge) अर्थात वैद्यकीय व्यावसायिकाच्या प्रतिज्ञेचा समावेश आहे. ही फिजिशियन प्लेज म्हणजे वर्ल्ड मेडिकल असोसिएशनने (World Medical Association) 2017मध्ये सुधारणा केलेलं जीनिव्हा डिक्लरेशन (Geneva Declaration) आहे. ‘मेडिकल प्रॅक्टिशनर्स प्रोफेशनल कंडक्ट रेग्युलेशन्स 2022’चा मसुदा नॅशनल मेडिकल कमिशनने जाहीर केला असून, त्यावर सामान्य नागरिक, तज्ज्ञ आणि या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींच्या सूचना व हरकती मागवल्या आहेत. वाचा : नाशिकमध्ये भरदिवसा उद्योजकाची हत्या; तलवारीने सपासप वार करुन संपवलं, CCTV आला समोर 2022च्या फेब्रुवारीमध्ये अशी काही वृत्तं प्रसिद्ध झाली होती, की हिप्पोक्रॅटिक ओथऐवजी चरक शपथ आणण्याचा विचार NMC करत आहे. आयुर्वेदातले महर्षी चरक यांच्या नावावरून ही शपथ देणार असल्याचं त्यात म्हटलं होतं. दरम्यान, हिप्पोक्रॅटिक ओथऐवजी चरक शपथ आणण्याचा कोणताही प्रस्ताव NMC ने मांडलेला नाही, असं आरोग्य मंत्रालयाकडून मार्च महिन्यात लोकसभेत स्पष्ट करण्यात आलं होतं. NMCने नंतर कम्पीटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशनसाठी (Competency Based Medical Education) काही मार्गदर्शक सूचना आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या. त्यात असं म्हटलं आहे, की जेव्हा एखादा विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेतो, तेव्हा सुधारित महर्षी चरक शपथेची शिफारस केली जाते. त्यात महर्षी चरक शपथेचा संक्षिप्त मजकूरही देण्यात आला आहे; मात्र असं असलं तरीही, हिप्पोक्रॅटिक ओथच्या ऐवजी चरक शपथ दिली जात आहे असा उल्लेख तेथे नव्हता. तसंच, ही चरक शपथ बंधनकारक असल्याचंही त्यात म्हटलेलं नव्हतं. वाचा : पुण्यातील सराफाला पाण्याची बाटली पडली 30 लाखांना, STतून उतरताच घडला भयंकर प्रकार मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (Medical Council of India) आधी प्रसिद्ध केलेल्या प्रोफेशनल कंडक्ट रेग्युलेशन्समध्येही हिप्पोक्रॅटिक ओथचा उल्लेख नव्हता; मात्र त्यात जीनिव्हा डिक्लरेशनची संक्षिप्त आणि सुधारित आवृत्ती देण्यात आली होती. NMC अंतर्गत येणाऱ्या अंडरग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डाची बैठक फेब्रुवारीत झाली होती. त्यावेळी हिप्पोक्रॅटिक ओथच्या ऐवजी चरक शपथेचा समावेश केला जावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला होता. दरम्यान, NMC ने जाहीर केलेल्या नोटीसमध्ये असलेलं या बैठकीचं इतिवृत्त खरं असल्याचं नाकारलेलं नाही. कारण ते इतिवृत्त सोशल मीडियावर व्हायरल देखील झालं होतं; मात्र ही बैठक NMC ची नव्हती, तर ती UGMEBची होती, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.