मुंबई 15 फेब्रुवारी : ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) टूलकिट (Toolkit) प्रकरणात पोलिसांनी बंगळुरू येथून दिशा रवीला (Disha Ravi) शनिवारी अटक केली आहे. या अटकेनंतर दिल्ली न्यायालयानं सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील निकिता जेकब(Nikita Jacob) विरोधात अजामिनपात्र वॉरंट बजावलं आहे. ग्रेट थनबर्गनं सोशल मीडियावर शेअर केलेलं टूलकिट बनवण्यात निकिताचाही हात असल्याचं म्हटलं जात आहे. निकिता जेकब हिने अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी याचिकाही दाखल केली आहे. याच बातम्यांमुळे माध्यमांमध्ये झळकत असलेली निकिता जेकब नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कोण आहे निकिता जेकब निकिता जेकब मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करते. यासोबतच निकिता एक सामाजिक कार्यकर्तीदेखील आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार टूलकिट प्रकरणात नाव आल्यानंतर निकिता जेकब फरार आहे. ती भारतविरोधात अभियानांमध्ये भाग घ्यायची. पोलिसांचा असा आरोप आहे, की झूमवर झालेल्या एक मीटींगमध्ये एक योजना आखली गेली होती. यात निकिता जेकब, दिशा रवी आणि अन्य काही लोक सामील होते. दरम्यान निकिता जेकबनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. निकिता जेकबच्या घराची झडती घेण्यासाठी ११ फेब्रुवारीला पोलीस तिच्या घरी गेली होते, असं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमधील सूत्रांनी सांगितलं. संध्याकाळच्या सुमारास ही टीम निकिता जेकब यांच्या घरी पोहोचली, त्यावेळी त्यांनी निकिता जेकब यांची कुठलीही चौकशी केली नाही. यानंतर या चौकशीत सहकार्य करण्याचं आश्वासन निकितानं दिलं होतं. मात्र, आता ती फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.