JOIN US
मराठी बातम्या / देश / TRP बाबत माहिती प्रसारण खात्याच्या निर्णयाला NBDA चा पाठिंबा, पारदर्शकतेसाठीच्या सुधारणांचं स्वागत

TRP बाबत माहिती प्रसारण खात्याच्या निर्णयाला NBDA चा पाठिंबा, पारदर्शकतेसाठीच्या सुधारणांचं स्वागत

TRP बाबत माहिती प्रसारण विभागानं घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून टीआरपी मोजण्याच्या पद्धतीत अधिक पारदर्शकता अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया NBDA नं दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 जानेवारी: देशातील वृत्तवाहिन्यांचे (News Channels) टीआरपी (TRP) सुरु करण्याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याच्या (I&B department) निर्णयाला पाठिंबा (Support) देत असल्याचं न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशननं (NBDA) म्हटलं आहे. टीआरपी मोजण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, शास्त्रोक्तपणा आणून त्यातील कमतरता दूर कऱण्याच्या दिशेनं सरकारनं टाकलेलं पाऊल स्वागतार्ह असल्याचं NBDA नं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.   सुधारणांचं स्वागत टीआरपी मोजणारी संस्था BARC च्या कारभारात सुधारणा होण्यासाठी सुचवण्यात आलेले उपाय योग्य असून NBDA नं केलेल्या सूचनांचा गांभिर्यानं विचार करण्यात आल्याबद्दल संघटनेनं समाधान व्यक्त केलं आहे. टेलिव्हिजनसाठीचा टीआरपी मोजण्याच्या प्रक्रियेत त्रुटी आहेत, ही बाब माहिती आणि प्रसारण खात्यानं मान्य केल्याबद्दल संघटनेनं सरकारचे आभार मानले आहेत.   पुनर्रचना गरजेचीच BARC ची पुनर्रचना करण्याचा निर्णय़ हा अत्यंत आवश्यक होता, असं म्हणत संघटनेकडून सरकारनं सुचवलेल्या बदलांचं स्वागत करण्यात आलं आहे. बार्कच्या बोर्डाची पुनर्रचना, टेक्निकल कमिटीची पुनर्रचना, स्वतंत्र सदस्यांची नियुक्ती आणि पर्मनंट ओव्हरसाईट कमिटी या बाबींमुळे टीआरपी मोजण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा विश्वास संघटनेनं व्यक्त केला आहे. जॉइंट वर्किंग ग्रुप प्रसार भारती सीईओंच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणारा संयुक्त कृती गट म्हणजेच जॉइंट वर्किंग ग्रुप हा रिटर्न पाथ डेटा म्हणजेच RPD बाबत सूसूत्रता आणण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास NBDA नं व्यक्त केला आहे.   सुधारणांना वाव सध्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या सूचनांनुसार BARC नं स्विकारलेल्या सुधारणा स्वागतार्ह आहेतच, मात्र त्याशिवाय इतरही अनेक सुधारणांना वाव असल्याचं NBDA नं म्हटलं आहे. टीआरपीच्या प्रक्रियेत कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही, यासाठी प्रक्रिया अधिक सक्षम आणि सुरक्षित करणं गरजेचं असल्याचं मत संघटनेकडून व्यक्त करण्यात आलं आहे. BARC नं सँपल साईज वाढवण्याची गरज असल्याचंही NBDA नं म्हटलं आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या